फुगड्या – उखाणे – फेर – कोंबडा

फुगड्या - उखाणे - फेर - कोंबडा - fugdya - ukhane

महाराष्ट्रात मुली व स्त्रिया यांच्यात लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे फुगडी. दोन ते जास्तीत जास्त आठ मुली किवा स्त्रिया एकत्र येवुन फुगड्या म्हण्तात, किंवा उखाणे घेतात किंवा पिंगा घालतात. किंवा पक पक असा आवाज पण काढतात याला पकवा असे म्हणतात्. मुली, स्त्रिया मंगळागौर, गौरी- गणपतीवेळी फुगड्या – उखाणे उत्साहाने खेळतात.

मराठी उखाणे

marathi-ukhane

उखाण्यातून पतीचे नाव घ्यायचे ती कला सर्वांनाच जमते असे नाही. दोन तीन ओळींपासून ते लांबलचक असा उखाणा घेतला जातो. या उखाण्यांमधून चालीरिती, माहेरची, सासरची नाती, सण नवर्‍याचे वर्णन याबरोबर त्यात इतिहास, भूगोलाचाही यमक जुळवत समावेश केला जातो.   मराठी उखाणे