मालवणी सरंग्याची कळपुटी

Prep Time: 15 minutes

Cook Time: 10 minutes

Total Time: 25 minutes

Category: Sea Food : Fish : Black Pomfret

Cuisine: Malvani Cuisine

मालवणी सरंग्याची कळपुटी

मालवणी सरंग्याची कळपुटी - Black Pomfret head dish - सरंग्याच्या (हलवा) डोक्यापासून बनवलेली मालवणी मसल्याची स्पेशल पाककृती. या साठी सरंग्याच्या डोक्याच्या भागाचे साधारण १ इंच अकराचे तुकडे घ्यावे.

  साहित्य
 • या साठी सरंग्याच्या डोक्याच्या भागाचे साधारण १ इंच अकराचे तुकडे घ्यावे.
 • १ वाटी सरंग्याच्या डोक्याचे तुकडे
 • २ वाटी बारीक चिरलेला कांदा
 • अर्धी वाटी किसलेले खोबरे
 • २ चमचे चिंचेचा कोळ
 • १ चमचा मालवणी मसाला
 • अर्धा चमचा हळद पूड
 • आवश्यकते नुसार तेल
 • चवी पुरते मीठ
 • २-३ चमचे चिरलेली कोथिंबीर
  सरंग्याची कळपुटी - कृती
 • तेल चांगले तापल्यावर त्यात कांदा नीट परतून घ्यावा व त्यातच मीठ, मसाला,हळद घालावी.
 • कांदा मऊ झाल्यावर त्यात सरंग्याचे तुकडे घालून परतावे.
 • चिंचेचा कोळ घालून परत परतून घेऊन झाकण ठेवावे. ग्यास मंदच ठेवावा.
 • ३ मिनिटांनी ग्यास बंद करून त्यात खोबरे व कोथिंबीर घालावी.

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

http://malvani.com/black-pomfret-head-dish/

ताजे मासे कसे ओळखावे?

 

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.

Latest posts by Maai (see all)

मालवणी सरंग्याची कळपुटी