सुका बांगडा – जोवल्याची चटणी

Prep Time: 10 minutes

Cook Time: 5 minutes

Total Time: 15 minutes

सुका बांगडा – जोवल्याची चटणी

मोठ्या पावसात बरेचदा मासे मिळणं दुरापास्त होतं अशावेळी समुद्राच्या माशांची चटक असलेल्या बहुसंख्य मालवणी लोकांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. मे महिन्याच्या बाजारातून आणलेले सुके बांगडे (suka bangda) किवा जोवला ( jovala/javale - बारीक सुकी सुंगटे/सुकट) यांची मग आठवण येते.

डाळ-भात आणि चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेला सुका बांगडा suka bangda अशी दुपारच्या जेवणाची तयारी होते किंवा अगदी पाचच मिनिटात कांदा खोबरं आणि सुका जोवला jovala/jowala तव्यावर परतून लाळ टपकवणारी कोशिंबीर केली जाते.

या ठिकाणी दिलेली कृती चटणीची आहे त्यात सुक्या बांगड्या ऐवजी सुका जोवलाही वापरता येतो आणि वेगळ्या चवीची चटणी तयार होते.

    साहित्य:
  • तव्यावर भाजलेला १०० ग्राम जोवला - jovala
  • किंवा निखाऱ्यावर भाजून बारीक केलेला एक सुका बांगडा - suka bagnda
  • एक इंच आले
  • ४ लसूण पाकळ्या
  • १ चमचा मिरची पूड (हिरवा मसाला )
  • १ खवलेला ताजा नारळ
  • चावी पुरते मीठ
  • १-२ चिमुट हळद
    सुकाट / बांगडा / जोवल्याची चटणी कृती:
  • प्रथम खवलेला नारळ, १ चमचा मसाला, चिमूटभर हळद, आल्या-लसणाची पेस्ट मिक्सरला लाऊन किंवा पाट्यावर बारीक वाटून घ्या. पाणी अजिबात वापरू नका.
  • या वाटपाच्या गोळयामध्ये चवीपुरते मीठ व सुक्या बांगड्याचे तुकडे किंवा भाजलेला जोवला व्यवस्थित मिक्स करा.
  • बस्स, चटणी तयार.
  • या चटणी बरोबर भाकरी किंवा चपाती फारच छान लागते.

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

http://malvani.com/dried-prawns-bangda-chatni-malvani/

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.

Latest posts by Maai (see all)

सुका बांगडा – जोवल्याची मालवणी चटणी
Tagged on: