झेपात तितक्या malvani poetry
झेपात तितक्या

तुका बघलय थयसून
जीव खेच्यातच रमाना
तुझ्या डोळ्यात टक लावचा
माझ्यात इतक्या धाडस नाय
तिया माझाच व्हवचा
मन सारख्या कोकालता
दोपार तिपार जयथय
तुझ्याच पाठ्सून भटकता
पण त्या दिवशी तिया माका
त्वांड बघ म्हणान हिनयलय
थयसून तुझ्या तोंडार मिया
शीरा मारुचा ठरलय
आता वगीच कधी झुराचा
खोट्या आशेर रव्हाचा
मिळात ताच आपला म्हणान
झेपात तितक्या जगाचा…

महेंद्र मातोंडकर, वेंगुर्ले.

mahendra

Guest writer

Latest posts by mahendra (see all)

झेपात तितक्या
Tagged on: