काळ्या वाटाण्याची आमटी

Prep Time: 15 minutes

Cook Time: 15 minutes

Total Time: 30 minutes

Category: Curry Recipes : Black peas curry

Cuisine: Malvani Cuisine

काळ्या वाटाण्याची आमटी

काळ्या वाटाण्याची आमटी - Kalya Vatanyachi Aamti किंवा उसळ ही मालवणी मसाल्याची पाककृती कोकणातील घरांमध्ये अगदी कोंबडी मटणाच्या तोडीसतोड बनविली जाते.

  साहित्य
 • १ वाटी काळे वाटणे
 • १ वाटी खोबरे
 • २ कांदे
 • २ चमचे मालवणी मसाला
 • १ चमचा गरम मसाला
 • अर्धा चमचा हळद पूड
 • २ चमचे तेल
 • २ आमसुले (कोकम)
 • चवीनुसार मीठ
  काळ्या वाटाण्याची आमटी - कृती
 • आदल्या रात्री काळे वाटणे भिजत घालून ठेवावेत.
 • सकाळी कुकरला मऊ शिजून घ्यावेत.
 • अर्धा चमचा तेलावर १ कांदा आणि खोबरे खरपूस भाजून मिक्सरला बारीक वाटावे.
 • मिक्सरला वाटताना १ चमचा शिजवलेले वाटाणे त्यात घालावेत.
 • वरील वाटण, दोन्ही मसाले, हळद पूड व मीठ शिजवलेल्या वाटाण्यात घालून चांगले शिजवावे.
 • उतरल्यावर १ कांदा बारीक चिरून, शक्य तो खोबरेल तेलावर खमंग फोडणी करून आमटीत घालावी.
 • दोन सोलं घालावीत.

शिजवताना आवडत असल्यास खोबऱ्याचे काप किंवा ओले काजूगर घालावे.

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

http://malvani.com/kalya-vatanyachi-aamti/

आंबोळी – खापरोळी

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.

Latest posts by Maai (see all)

काळ्या वाटाण्याची आमटी – पाककृती