कोंकण दर्शन – बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली: पोलादपूरला सकळी नऊ वाजता नाश्ता केला होता व त्यानंतर काहीच खाल्ले नव्हते पण त्याचा जास्त विचार न करता सरळ विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला. सुरुवातीलाच दिसलेला विद्यापीठाचा  नकाशा (Layout) पाहून एवढ्या प्रचंड आवारात फिरायल किती वेळ लागेल याचा हिशेब सुरू झाला. प्रथम प्रशासकीय कार्यालयात गेलो तर त्यांनी पुन्हा मला चक्क बाहेरचा रस्ता दाखवत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात जाण्यास सांगितले. तिथे पोचल्यावर स्वागत कक्षातील चव्हाण बाईंनी हसून स्वागत केले त्यामुळे आपण योग्य ठिकाणी पोचलो आहोत याची खात्री वाटली.

Konkan Darshan Diary – Day three

from Poladpur to Dapoli – Konkan krishi vidyapeeth, Murud and then back to Parshurama ghat of Chiplun in Ratnagiri district.

https://www.facebook.com/media/set/?set=a.354310237916963.101950.351758361505484&type=1&l=9e55958c6a

केंद्राचे संचालक डॉ. हर्डीकर दुपारी उशिराने बाहेर पडले होते त्यामुळे बाईंनी मला चार वाजता येण्यास सांगितले. आजचा दिवस वाया जाणार नाही असा विश्वास आता वाटू लागला आणि मग थोडी भूकही जाणऊ लागली. मी बाहेर येऊन बऱ्याच दिवसांनी खरेतर वर्षांनी, दोन शहाळी खाल्ली व नंतर थोडसं पाईच फिरलो.

बरोबर चारला पुन्हा केंदात गेलो. डॉ. हर्डीकर आलेले होते, बाईंनी मला बसायला सांगून त्यांना सूचना पाठवली. काहीवेळाने डॉ. हर्डीकर आले व त्यांनी अगत्याने चौकशी केली. विद्यापीठाचा प्रचंड परिसर फिरून गोंधळात पडण्यापेक्षा माहिती केंद्रातच असलेल्या प्रत्येक विभागाच्या छोट्या प्रतिकृती, छायाचित्रे, माहिती पत्रके यातूनच विद्यापीठाचे कार्य व विद्यापीठाचा इतिहास भूगोल समजून घेण्याची उत्तम सोय केलेली होती. ते सर्व पाहताना कृषि व कृषि विद्यापीठाला आपल्या जीवनात असलेले अनन्य साधारण महत्व जाणवत होते.

कोंकण दर्शन – कृषी विद्यापीठाचे महत्व

शहरातील यांत्रिक प्रगतीला भुलून मानवाच्या मुलभूत गरजा – अन्न, वस्त्र व निवारा पुरवणाऱ्या निसर्गाच्या या वरदानाला आपण विसरत चाललो आहोत. गावोगावची शेतीवाडी ओस पडत चालली आहे आणि मोकळ्या झालेल्या या जागेवर सिमेंटची भूतं उभी राहत आहेत. कोकण फिरताना मला बऱ्याचदा हे सत्य दिसलं आणि वाटू लागलं, आपण वेळीच सावध झालो नाही तर कदाचित काही काळाने आपल्याला भाजीपाला, आले, लिंबू आणि कोथिंबीरीची जुडी सुद्धा चीन मधून आयात करावी लागेल.

माहिती केंद्रात बरीचशी फोटोग्राफी केल्यानंतर मला जाणवलं की आपल्या साईटवर स्वतंत्र कृषि विभाग करून तिथे याविषयी अधिक माहिती लिहिणे अधिक योग्य होईल. फोटोग्राफी आटोपून पुन्हा डॉ. हर्डीकरना धन्यवाद देण्यासाठी भेटलो. या वर्षी विद्यापीठाला चाळीस हजार लोकांनी भेट दिल्याचं ते उत्साहाने म्हणाले. लोकांना पुन्हा शेतीचं महत्व जाणऊ लागेल अशी आम्ही आशा व्यक्त केली. बोलता बोलता माझा एक वर्ग मित्र बारावीनंतर इथे शिकल्याचं सांगितलं तर त्यांनी त्याच नाव विचारलं, एन.व्ही. प्रभू त्यांचा जुनियर होता व सध्या तो चंद्रपूरला वैनगंगा बँकेत असल्याचं ते म्हणाले. त्यांनी लगेच त्याला मोबाईलवर फोनही लावला पण एन.व्ही. त्यावेळी प्रवासात असल्याने जास्त बातचीत होऊ सकाळी नाही. पाच वाजत आले होते, निघताना त्यांनी मला हर्णे बंदरा पेक्षा मुरुडच्या समुद्र किनाऱ्याला भेट देण्यास सांगितले.

कोंकण दर्शन – मुरुड:

चहा पिऊन मी मुरुड किनाऱ्याकडे मोर्चा वळवला. मुरुडचा किनारा फारच प्रचंड आहे आणि शांत व स्वच्छ ही आहे. सूर्यास्त होऊन अंधार पडायला लागला होता आणि माझा दुसरे दिवशीचा कार्यक्रम चिपळूण मधील परशुराम घाटापासून सुरू होणार होता. वाट इथून बरीच लांबची असल्याने आम्हाला आता निघावंच लागलं….

कोंकण दर्शन Konkan Darshan

|| इतिश्री कोंकण दर्शनं तृतियोऽदिन समाप्त: ||
|| श्री परशुरामार्पणमस्तु ||

Links For more info. on Konkan Krishi Vidyapeeth:

http://www.dbskkv.org/
http://en.wikipedia.org/wiki/Dr._Balasaheb_Sawant_Konkan_Krishi_Vidyapeeth

नाना

I am a web designer though interested more in SEO and SEM. I am passionate about Natya Sangeet, Writing and about Malvani of course.

Latest posts by नाना (see all)

कोंकण दर्शन डायरी १६-११-२०११
Tagged on: