मालवण चा प्रसिद्ध चीवला बीच (चीवाल्याची वेळ) शहराच्या पूर्वेला आहे. चीवला बीच अगदी शहराला लागूनच आहे. शहरातून चीवला बीचला तुम्ही रिक्षाने किंवा भाड्याच्या सायकलने किंवा अगदी चालतही जाऊ शकता. एकदा तिथे पोचल्यावर फक्त समुद्र किनाऱ्याची मौज लुटण्यावरच लक्स केंद्रित करा.

आपल्या चाकोरीबद्ध जीवनातील पासून मुक्त होण्यासाठी पर्यटन हा एक अनोखा मार्ग आहे. अशावेळी बहुतेक लोक सागर किनारी जाण्यास प्राधान्य देतात. सागराची भव्यता पहाताना हळूहळू आयुष्यातील सर्व कटकटींचा विसर पडून मन प्रसंनेतेने भरून जाते. हीच अनुभूती तुम्हाला मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर येईल.
समुद्र किनाऱ्यावर अद्यापतरी पर्यटकांनी तोबा गर्दी करून जत्रेचे स्वरूप आणलेले नाही त्यामुळेच तुम्ही इथे मन:शांती मिळण्याची अपेक्षा ठेऊ शकता. किनाऱ्यावर अगदी अद्ययावत सुविधा नसल्या तरी निसर्ग सानिध्याचा आनंद देणारी चांगली हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही रासानापुर्तीचा आनंद मिळऊ शकता. बहुतेक सर्वच हॉटेल्स मध्ये चांगलं मच्छी जेवण मिळेल पण मालवण येथे खोताचे हॉटेल आणि मायेकाराची खानावळ एकेकाळी फारच लोकप्रिय होती त्यामुळे त्यांना मुद्दाम भेट देणे कदाचित जास्त फायद्याचे ठरेल.

मालवणला जाणाऱ्या पर्यटकांचे मुख्य कार्यक्रम – जेवणाच्या ताटातील गरमागरम मासे फस्त करणे – समुद्रातील मनमोहक सागर विश्वाला भेट देणे आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर भटंकती करणे. बंदराकडून होडीने तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येते. किल्ला तसा बराच मोठं आहे त्यामुळे या भेटीचे सार्थक करायचे असल्यास आणि सिंधुर्ग किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास एखाद्या गाईड बरोबर जाने उत्तम!
मालवण येथे पोहोचण्याचे मार्ग:
विमानाने: १९० कि.मी. दाभोली-गोवा एअरपोर्ट
रेल्वेने: ४५ की.मी. कुडाळ रेल्वे स्टेशन
मोटरगाडीने: ५४० की.मी. मुंबई पासून, १६० की.मी. कोल्हापूर पासून, १७५ की.मी. बेळगाव पासून.
मालवण येथे काय पहाल:
तारकर्लीतील MTDC च्या कोंकणी झोपड्या (Konkani huts)
मालवणी जेवण आणि खास मच्छी पाकक्रिया
स्कुबा डायव्हिंग – स्नोर्कलिंग
किल्ले: पद्म्गड आणि सिंधुदुर्ग किल्ला

राहण्याची सोय असणारी बरीच हॉटेल्स आहेत पण खिशाला परवडणारी आणि चांगल्या सुविधा पुरवणारी हॉटेल्स शोधण्यास मात्र थोडा वेळ खर्च करावा लागेल – तुम्हाला कुणीतरी या विषयी काही संदर्भ (reference) दिलेला असल्यास काम सोपे होईल. मालवण येथील हॉटेल्सचा आढावा/परीक्षण (reviews by real people) घेणाऱ्या काही वेबसाईट शोधून पहा.
नाना
Latest posts by नाना (see all)
- भूतावळ – top 10 close encounters - ऑगस्ट 29, 2018
- मसाल्याचे पदार्थ ओळखा..(भाग 2) - नोव्हेंबर 11, 2017
- मसाल्याचे पदार्थ ओळखा..(भाग १) - नोव्हेंबर 11, 2017