मालवणी गरम मसाला - garam masala

मालवणी गरम मसाला - garam masala

मालवणी गरम मसाला - पुढे सर्वसाधारण मालवणी मसाल्याची २ किलोची कृती देत आहे. हा मसाला शाकाहारी/मांसाहारी जेवणासाठी चालतो. मासला वापरायला सुरुवात केल्यावर तुम्हाला वर्षभरासाठी किती लागेल याची कल्पना येईल. काही गृहिणींच्या साहित्यात व कृतीत फरक असू शकतो.

  मसाला साहित्य:
 • १ किलो सुकी लाल मिरची (Dried Red Chillies)- बेडगी मिरची चवदार असते तर कोकणातली मिरची फारच तिखट असते.
 • अर्धा किलो धणे (Coriander Seeds)
 • २० ग्राम लवंगा (Cloves)
 • ५० ग्राम काळी मीरी (black Peppercorns)
 • १०० ग्राम बडीशेप (Fennel Seeds)
 • २५ ग्राम जिरे (Cumin Seeds)
 • २५ ग्राम शाही जिरे (Black Cumin Seeds)
 • २० ग्राम काळी वेलची (Black Brown Cardamom)
 • ५० ग्राम दालचीनी (Cinnamon)
 • ५० ग्राम दगडफुल (Stone flower)
 • ५० ग्राम नागकेशर (Nagkeshar)
 • २५ ग्राम काळी मोहरी (Black Mustard Seeds)
 • २५ ग्राम हळकुंड (Dried Turmeric Root)
 • १० ग्राम बदलफुल (Star Anise)
 • २५ ग्राम खड्याचा हिंग (Whole Asafoetida Stones)
 • २ जायफळ (Nutmeg)
  मसाला कृती:
 • प्रथम हळकुंड, जायफळ व हिंग यांचे बारीक तुकडे करा.
 • धणे,जायफळ व लाल मिरची सोडून बाकीच्या सर्व वस्तू स्वतंत्रपणे थोड्याश्या तेलात परतून घ्या.
 • सर्वात शेवटी लाल मिरची व धणे परतून घ्या.
 • सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून (दळून) घ्या म्हणजे मसाला तयार होईल.
 • मालवणी गरम मसाला व्यवस्थित हवाबंद डब्यात ठेवल्यास हा चांगलं वर्षभर टिकतो.
 • आता बाजारात सुद्धा पाकिटातून मालवणी गरम मसाला मिळतो. घरच्या मसाल्याची सर पाकिटातल्या मसाल्याला कशी येईल? तरीही नाईलाज म्हणून

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

http://malvani.com/malvani-garam-masala/

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.

Latest posts by Maai (see all)

मालवणी गरम मसाला
Tagged on: