मालवणी कोंबडी वडे - सागुती | Kombdi Vade Saguti

Prep Time: 35 minutes

Cook Time: 25 minutes

Total Time: 1 hour

Category: Bread recipes : Vade / Wade

Cuisine: Indian : Malvani

मालवणी कोंबडी वडे - सागुती | Kombdi Vade Saguti

मालवणी कोंबडी वडे किंवा सागुती वडे (Malvani Chichen/Kombadi Vade/Saguti Vade) आता तर इंटरनेट मुळे जगप्रसिध्द झालेले आहेत आणि कृतीत थोडाफार फरक राहिला तरीही खवय्यांना नेहमीच खुणावत राहील. कोंबडी वडे यातील वडे हा प्रकार पूर्ण शाकाहारी आहे, अगदी नुसत्या चहा बरोबर सुद्धा फिट्ट बसतो पण कोंबडी बरोबर जोडी जमली की चवीचा आनंद शतगुणित होतो. इथे वड्यांची रेसिपी दिलेली आहे आणि तळाला मालवणी चिकन सागुतीची सुद्धा लिंक दिलेली आहे.

  साहित्य:
 • १ कप तांदळाचे पीठ (Rice flour)
 • पाव कप चण्याचे पीठ (Gram flour)
 • अर्धा कप उडीद डाळ (Urad dal)
 • १ टीस्पून धणे (Coriander seeds)
 • ३ टीस्पून मेथीचे दाणे (Methi seeds)
 • अर्धा टीस्पून हळद (Turmeric powder)
 • अर्धा टीस्पून जिरे (Cumin powder)
 • ३ टीस्पून तेल (Oil)
 • चवी पुरते मीठ (Salt)
  वडे कृती:
 • अगोदर एक रात्र उडीद डाळ चांगली ३-४ वेळा स्वच्छ धुऊन मोठ्या भांड्यात भिजत ठेवा.
 • दुसरे दिवशी पाणी गळून टाका आणि डाळ मिक्सरला थोडीशी जाडसर लाऊन घ्या.
 • नंतर धणे व मेथी एकत्र मिक्सरवर बारीक लाऊन पावडर करा.
 • आता परातीत तांदळाचे पीठ, हळद, जिरे, धणे व मेथीची पावडर,
 • मीठ आणि जिरे एकत्र करा आणि ३ टीस्पून तेल गरम करून त्यात टाका.
 • हे मिश्रण चांगलं ढवळा आणि मग त्यात उडदाची पिठी ओतून पीठ मळायला सुरुवात करा.
 • आवश्यकते नुसार थोडंस पाणी घ्या पण पीठ घट्ट मळून घ्या व १५-२० मिनिटं तसचं ठेवा.
 • आता साधारण छोट्या लिंबाच्या आकाराचे पीठाचे गोळे करून घ्या.
 • प्रत्येक गोळ्याला थोडंसं तेल लाऊन केळीच्या पानावर किंवा जाडसर प्लास्टिक पिशवीवर (दुधाच्या) किंवा हाताचा तळव्यावर हळूहळू थापटून पुरी प्रमाणे पसरट गोल आकार द्या.
 • कढईत तेल चांगलं तेल तापल्यावर एका बाजूने फिकट बदामी रंगाचे होईस्तोवर वडे तळून काढा.

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

http://malvani.com/malvani-kombdi-vade-marathi/

अस्सल मालवणी चिकन रेसिपी साठी इथे क्लिक करा

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.

Latest posts by Maai (see all)

मालवणी कोंबडी वडे – सागुती
Tagged on: