वाफवलेले मालवणी बांगडे

Prep Time: 15 minutes

Cook Time: 15 minutes

Total Time: 30 minutes

वाफवलेले मालवणी बांगडे

वाफवलेले मालवणी बांगडे (steam cooked mackerel) या प्रकारात तेलाचा वापर मुळीच केला जात नाही तसेच या प्रकारे शिजवलेले मासे फ्रीज मध्ये न ठेवताही २-३ दिवस चांगले राहतात. समुद्र किनाऱ्यापासून खूपच दूर असलेल्या कोकणातील खेडेगावांमध्ये पूर्वी खूपच लोकप्रिय होती. समुद्रातील किंवा नदीतील मासेही चालतील पण यातील मुख्य घटक आहे हळदीची पाने!!! ती नसल्यास केळीची पानेही चालतील.

    साहित्य:
  • सात ते आठ ताज्या बांगड्यांचे तुकडे (किंवा इतरही मासे चालतात)
  • मीठ चवीनुसार
  • हळद पाव टेबलस्पून
  • हिरवा मसाला 4 टेबलस्पून
  • आमसुले (कोकम) ५ ते ६
  • हळदीची पाने/केळीचे पान.
    वाफवलेले मालवणी बांगडे - कृती:
  • प्रथम एका भांड्यामध्ये मीठ, मसाला, हळद व आमसुले(कोकम) घालून किंचित पाणी टाकून जाडसर मिश्रण तयार करावे.
  • त्यामध्ये माशांचे तुकडे कालवून घ्यावे आणि थोडावेळ तसेच ठेवावे म्हणजे माशांना मीठ मसाला लागेल.
  • एका टोपात तळाला कुकरमध्ये टाकतो त्याप्रमाणे पाणी टाकावे. त्यावर एक/दोन इंच उंचीचे गरम भांडी उतरून ठेवायचे स्टँड (hot plate stand) किंवा लाकडाच्या बारीक पट्ट्या लावून पाण्याच्यावर सतल जागा तयार करावी.
  • वरील जाडसर मिश्रण (माश्यांसहित) हळदीच्या/केळीच्या पानात बांधावे. झाकण ठेवून त्यावर वजन ठेवावे व मंद ग्यासवर शिजवावे.
  • मासे शिजल्याचा वास आल्यानंतर ग्यास बंद करावा.
  • पूर्ण थंड झाल्यावर पाने काढून मासे खावेत.
  • दुसऱ्या दिवशीही खाता येतात. त्यामध्ये कांदा व तेल यांचा वापर करावा लागत नाही. थोड्याश्या सरावाने ही पाककृती चांगली जमेल व सर्वाना आवडेलही.

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

http://malvani.com/malvani-recipes-steam-cooked-mackerel/

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.

Latest posts by Maai (see all)

वाफवलेले मालवणी बांगडे
Tagged on: