Malvani Jokes
Malvani Jokes

शहामृगाची मान  (मालवणी विनोद | Malvani jokes)

मास्तर: गणा, शहामृगाची मान लांब का असते?

गणा: गुरुजी, तेचा डोक्या आणि शरीर हेच्यात खूपच अंतर असता म्हणान तेंका जोडूच्या साठी तेची मान पण लांब असता.

++++++++++

सखू आणि आका (मालवणी विनोद | Malvani jokes)

सखू आणि आका, दोन प्रौढ बायकांची बऱ्याच दिवसांनी समोरासमोरून येताना भेट होते. दोघींच्याही कानांचे भोंगे पार कामातून गेलेले आहेत.

सखू : आका, काय गो, खय बाजारात जातस काय?

आका: नाय गो बाये, जरा बाजारात जातंय.

सखू: होय काय? माका वाटला बाजारात जातस.

++++++++++

लादेनचा शीकरेट  (मालवणी विनोद | Malvani jokes)

रिटायर्ड शाळा मास्तर सातपुते यांना फक्त बारक्या बरोबरच बोलायला आवडायचे कारण त्याला आपल्या पेक्षा नक्कीच कमी ज्ञान असणार याची त्यानां खात्री होती. पण बारक्या पक्का ४२० आणि चार गावाचे पाणी प्यालेला बेरकी माणूस होता.

मास्तर: बंर का बारक्या, शेवटी अमेरिकेने लादेनला मारलं. कसा वर्ष भर प्लान करत होते. या कानाचा त्या कानाला पत्ता नाही लागू दिला. शेवटी रातोरात कमांडो घुसवले आणि उचललं त्याला.

बारको: मास्तरानू ते आपले पेपरातले आणि टीवी वैले बातमे. खरा काय झाला ता अगदीच थोड्या लोकांका म्हायती आसा. माका इचारा!!!

मास्तर: तुला काय एवढं माहित आहे रे?

बारको: मास्तरानू तुमचा याकच लगीन झाला, लादेनची ३ लग्ना झालंली. तिनय बायकांका आणि डीमीभर पोरांका  घेवन  बापडो  पा….च वर्षा एका घरात रवलो म्हणजे बगा!!! खय जाणा नाय आणि येणा. शेवटाक इटामलो. काय तरी करून सरळ ओबामाक फोन लायाल्यान. तोय लगीन झाल्लो दादलो, ऐकान तेचाय काळीज बापड्याचा  चरचरला. रातोरात हेलीक्याप्टर करून कमांडो धाडल्यान आणि लादेनाक मुक्ती दिल्यान.

(मास्तरांचा तोन्ड तासभर उघडाच रावला.)

++++++++++

कपडे धुवन घातले म्हणान  (मालवणी विनोद | Malvani jokes)

चौथीच्या स्कॉलरशिपच्या मोफत शिकवणीला मास्तरांच्या घरी गणा रोज जायचा तो अचानक दोन दिवस गेलाच नाही. तिसऱ्या दिवशी:

मास्तर: काय रे गणा, दोन दिवस आला नाहीस तो?

गणा: गुरुजी, माझ्याकडे एकच शर्ट आणि प्यांट आसा. परवा ती धुवक टाकली म्हणान येवक नाय झाला.

मास्तर: एक दिवसात वळतात कपडे! काल का आला नाहीस?

गणा: इल्लय मी गुरुजीनू. तुमच्या घराभायर तुमचा धोतार सुकत घातलाला दिसला म्हणान परत गेलय.

++++++++++

समाइची परिक्षा  (मालवणी विनोद | Malvani jokes)

बाबा: गणा, ह्या परिक्षेत नापास जाशीत तर परत माका बाबा म्हणान हाक मारू नको, कळला?

गणा: इतक्या कित्याक भियाक होया बाबानू? ही सादी समाइची परिक्षा, ती काय  डी.एन.ए. ची नाय.

नाना

I am a web designer though interested more in SEO and SEM. I am passionate about Natya Sangeet, Writing and about Malvani of course.

Latest posts by नाना (see all)

तेच विनोद मालवणीत – भाग १ (Malvani Jokes)
Tagged on: