फाटकाचो खांब! (मालवणी विनोद | Malvani jokes)

Malvani Jokes
Malvani Jokes

आपांची बायको बाकी नसली तरी वजनान आपांपेक्षा भलतीच सरस! आधीच खाव पिवची आवड जबरी आणि त्यात करून गेली दोन वर्षा सोबतीक डायबेटीस. शेंगदाणे- गुळ खाताना एक दिवस बसलीकडे चक्कर येवन पडली ती काय केल्या उठाना झाली. भोईर डॉक्टर इलो आणि ग्रीन सिग्नल दिल्यान. माणसा जमा जावन तयारी सुरू झाली. बाबलो मुंबैसून दुसऱ्या दिसा नव वाजाच्या आधी पोचणा शक्य नाय होता आणि तो पर्यंत काय बॉडी ठेवक ईली नसती. सुसला सासुरवाडीसून दोनच तासात पोचला असता पण आपा तेका सुद्धा थांबाक काकू करी होते. आपल्या लग्नात सुद्धा करुक नाय इतकी घाय आता आपांका लागलंली!  मनातली खुशी लपयत, झेपत नसताना सुद्धा आपानी तिरडेची एक बाजू सांभाळली.  तरातरा वाट काढीत मसणाकडे पोचासर आपा बरेच दमले. मसणाच्या फाटकाकडे आपांचो पाय जरासो घसारलो आणि तिरडी फाटकाच्या खांबाक आपाटली…. चमत्कार झालो! आपांची बायको तिरडेर उठान बसली. बाकीच्या तिघांनी तिरडी थयच टाकली आणि बोंब मारीत गावाकडे धूम ठोकली. अगदी पाच  सेकंदात सगळे गाववाले गायब. एकंदर प्रकार लक्षात येताच आपांच्या बायकोन मसणापासून घरापर्यात आपांची उलटी यात्रा काढल्यान.

झाल्या प्रकाराक डायबेटिक कोमा असा कायतरी म्हणतत इतक्या ज्ञान भोईर डॉक्टराक आसता तर गोठण्या सारख्या गावात तेनी आयुष्यभर इतकी यशस्वी प्रॅकटीस केलीच नसती.

या गोष्टीक चार म्हयने झाले आणि परत एक दिवस सकाळी धा वाजताना पेजबीज खावन आपांची बायको सेम टू सेम चक्कर येवन पडली. तरी संध्याकाळी चार वाजासर वाट बघल्यानी. गो, आता आरड मारू  नको…. वय झाला काय सगळ्यांकाच जावचा लागता….  मोठी भाग्यवान… सवाशीण गेली…. असा परत परत बोलान घरात रडणाऱ्या बायकांका उगी करीत होते. आणखी कलकलाट नको म्हणान मुद्दामच वाजप्याकां बोलावक नाय होता.

शेवटाक एकदाची तयारी पूर्ण झाली. या खेपेक मात्र आपा सावध होते. तिरडेच्या चारय बाजूंक बरे ताठ गडी लावन यात्रा सुरू झाली. मसणवट जवळ येताच आपा सगळ्यांच्या पुढे आरड मारीत धावले “तो फाटकाचो खांब मात्र सांभाळा रे बाबानू….  तो फाटकाचो खांब मात्र सांभाळा रे बाबानू”

तेच विनोद मालवणीत – वाचून हसा पोटभर.

नाना

I am a web designer though interested more in SEO and SEM. I am passionate about Natya Sangeet, Writing and about Malvani of course.

Latest posts by नाना (see all)

तेच विनोद मालवणीत – भाग 6 (Malvani Jokes)
Tagged on: