काळू पेलवान तिकीट काढीत नाय!

वाडीसून यष्टी आकेरेक येता आणि काळू पेलवान येष्टेक हात दाखयता. गाडयेत चढता, कंडक्टर तिकीट इचारता तर तो म्हणता “काळू पेलवान तिकीट काढीत नाय!” साडे सहा फुट उंचीच्या पेलवाना समोर पाच फुट दोन इंच उंचीच्या किरकोळ कंडक्टरची काय बोलाचीच हिम्मत जाणा नाय. इकडे तिकडे बघता तर सगळी यष्टी फिदी फिदी हसता कशी तेका वाटता.
झाला, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाक तीच कथा. अपमान सहन करून करून कंडक्टरचा मस्तक आता आउट जाता. मनातच तेका धडो शिकवचा ठरवन सहा म्हयन्याची सुटी घेता. अगदी मेहनत करून बरा जुडो कराटे आणि काय काय शिकता. आता तेका विश्वास वाटता की आपण पेलवानाक सहज चालेन्ज करुक शकतव.
कामार हजार जाता. यष्टी आकेरेक येता आणि काळू पेलवान येष्टेक हात दाखयता. गाडयेत चढता, कंडक्टर तिकीट इचारता तर तो म्हणता “काळू पेलवान तिकीट काढीत नाय!” कंडक्टर तेच्या अंगार धावान जाता आणि म्हणता ” xxx, तुझ्या काय बापसाची गाडी आसा काय? तिकीट घेवचाच पडताला. ”
काळू पेलवान शांतपणे : “काळू पेलवान तिकीट काढीत नाय! काळू पेलवानाकडे येष्टेचो पास आसा.” परत एकदा सगळी यष्टी फिदी फिदी हसता असा तेका वाटता.

==========================

 मात्र पोपटाच्या कळीक जाव नको….

Get your website
just @ Rs.600pm

Get more customers with your TRUE business partner.

बयोआजी एकटीच एद्यामोठ्या घरात रवा. नाय म्हणाक अमेरिकेच्या झीलन दिललो भलो मोठो अल्सेशन कुत्रो रॉकी आणि एक आफ्रिकन पोपट टोकी तिच्या सोबतिक असतत. एक दिवस म्हतारेक कुडाळच्या बँकेत जावचा असता पण त्याच दिसा नामो सुतार वळयचा दार दुरुस्त करुक येवचो असता. म्हातारी नाम्याक फोन करून सांगता “नाम्या, तू काय तो दुपारी ये, पक्याच्या दुकानातसून चावी घे आणि तुजा काय ता काम सुरु कर. रॉकी फक्त तुज्यार नजर ठेवन बसतलो, तुका काय करुचो नाय मात्र चुकान सुध्दा टोकीच्या कळीक जाव नको.”

नामो येता आणि आपला काम सुरु करता. थोड्या टायमान टोकी सुध्दा आपला काम सुरु करता – “ए तुजी ठाक ठाक बंद कर, ए तुजी करा करा बंद कर आणि चालत राव हयसून” सारखे दोन तास टोकीचा एकच गाणा ऐकान नाम्याचा मस्तक फिरता पण म्हतारेच्या वार्निंगची आठवण येवन नामो वगी रवता.

काम संपता, नामो मोठ्या तिडकीन टोकीच्या पिंजऱ्याकडे जाता आणि म्हणता “टोकी तुजी मानच मोडतंय आता, काय ती आरड मारीत बस मगे.”

त्या बरोबर टोकी आपला गाणा बदलता “रॉकी छू, धर तेका, रॉकी छू, धर तेका, रॉकी छू, धर तेका,…..”

=======================

साक्षात्कार

रवळनाथनामो एकदा नेहमीच्या वाटेन घराकडे जायत असता. वाटेत एक बारकीशी नदी असता. अर्ध्या नदीत येता तेवा अचानक एक भली थोरली काळी आकृती येवन त्याच्या मानेक धरता. नाम्याक समाजता, नदीतलो देवचार म्हणतत तो ह्योच. जीवाच्या आकांतान तो रवळनाथाचो धावो करता. ‘देवा धाव रे, देवा पाव रे’ आणि काय चमत्कार जाता तो सगळीकडे झगझगाट जावन रवळनाथ प्रकट जाता. ” अरे नाम्या, काय झालं? बोल का माझा धावा केलास? एरवी देव असतो यावर तुझा मुळीच विश्वास नाही. ” नामो म्हणता ” देवा माका हेच्यातसून वाचव रे बाबा, आणि देवा, तसा म्हटला तर माझो देवचारावर तरी खय विश्वास होतो?”

 

==================

हेड बाईंचा ऑपरेशन

हेडबाई गणाच्या आई वडिलांका पत्र पाठवन बोलावंन घेतत. म्हणतत तुमच्या मुलाक आमका काय शिकवक जमाचा नाय. तेका तुमी घेवन जावा आमी तेचा नाव कमी करतव. गणाच्या आवशीक भयंकर राग येता, शाळाच काय पण ती गाव सोडून शहरात रव्हाक जाता. ह्या गोष्टीक 15-20 वर्षा जातत. हेडबाई रिटायर जातत. कायतरी शिक पडतत आणि गावातलो डॉक्टर तेंका ऑपरेशन करुचा पडताला म्हणन सांगता. तसा ऑपरेशन करणारो जवळच्या शहरात एकच डॉक्टर असता. बाई नाईलाजान थय जातत. ऑपरेशन यशस्वी जाता आणि बाई शुध्दीवर येयत असतत. डॉक्टर थोडो वेळ बाईंकडे थांबतत. बाई कायतरी संगुचो प्रयत्न करतत, डोळे इकडे तिकडे फिरवतत. डॉक्टराक जरा बरा वाटता इतक्यात बाई अचानक मान टाकता. डॉक्टराक शॉकच लागता. असा कसा झाला म्हणान इकडे तिकडे बघता. तेच्या लक्षात येता, गणा नावाचो वार्ड्बॉय साफसफाय करुक इल्लो असता आणि तेनी बाईच्या वांटीलेटरची पिन काढून अपलो मोबायल थय चार्ज करुक लायललो असता.
=========================

नाना

I am a web designer though interested more in SEO and SEM. I am passionate about Natya Sangeet, Writing and about Malvani of course.

Latest posts by नाना (see all)

तेच विनोद मालवणीत – भाग 7 (Malvani Jokes)
Tagged on: