नाचणी सत्वाच्या वड्या

Prep Time: 20 minutes

Cook Time: 10 minutes

Total Time: 30 minutes

Category: Snacks : Nachani

Cuisine: Malvani Cuisine

नाचणी सत्वाच्या वड्या

नाचणी हे धान्य अतिशय पौष्टिक व पचायला हलके असते. त्यात असलेल्या भरपूर प्रमाणातील लोह, कॅलशीयम, प्रोटीन्स आणि अन्य विटामिन्स मुळे त्याच्या सत्वापासून खास करून मुलांसाठी पौष्टिक खाऊ मिळू शकतो.

  साहित्य
 • २ वाट्या नाचणी
 • सत्वाचा निम्मे गुळ
 • अर्धा चमचा वेलची पूड
 • अर्धी वाटी खोबरे
 • काजू तुकडा
  नाचणी सत्वाच्या वड्या - कृती
 • नाचणी दोन तीन वेळा नीट धुऊन भिजत टाकावी.
 • सकाळी मिक्सर वर बारीक वाटावी.
 • थोडे पाणी घालून मलमलच्या कपड्यात गाळून सत्व काढून घ्यावे.
 • जरा वेळ तसेच ठेऊन वर निवळून आलेले पाणी काढून टाकावे.
 • जेवढे सत्व असेल त्याच्या निम्मे गुळ त्यात बारीक चिरून घालावा व हाताने नीट विरघळवून घ्यावा.
 • हे मिश्रण मंद ग्यासवर ठेऊन सारखे हलवत राहावे व गुठळ्या होऊ देऊ नये.
 • कडेने सुटून गोळा होत आला की वेलची पूड घालून उतरावे.
 • तुपाचा हात लावलेल्या ताटात थापून गार झल्यावर वड्या पाडाव्यात.
 • सजावटी साठी खोबरे / काजू तुकडा लावावा.

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

http://malvani.com/nachani-satv-vadya/

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.

Latest posts by Maai (see all)

नाचणी सत्वाच्या वड्या
Tagged on: