malvani poetry पण लायनच खय जुळनाशी झाली

पण लायनच खय जुळनाशी झाली

हयसून गेलय थयसून गेलय
पण कोणाचाच कोण दिसना
हेचा बघितलय आन् तेचा बघितलय
पण कोणाचाच काय पटना

भोवर्‍यासारखो गरगरलंय
पण भूरळ काय ती पडना
खिसो पक्को रितो झालो
पण फिरना काय सूटना

लग्ना कितकिव काय होयनत
पण होवये काय बदलत नाय
छोकरी काय नोकरी काय
येरझारे काय सूटनत नाय

उकळीकच जर जमीन नाय
तर हातात नांगर धरून उपयोग काय?
लेखणीतली शाई उकिर्ड्यावर पण सांडली
डोक्या पाजळून तरी करतलंस काय?

धाक-धाक आणि राक-राक
मायला इतकिच काय जिंदगानी
पण असो-तसो आयकाचय नाय
रक्तात भिंदारता जवानीची लाली

पण ह्या बाकी काय खोटा नाय
ग्रामपंचायत गेली आन् नगरपंचायत ईली
हातात मोबाइल ईलो खरो
पण लायनच खय जुळनाशी झाली

-अमर पवार

amarp

Guest writer

Latest posts by amarp (see all)

पण लायनच खय जुळनाशी झाली
Tagged on: