अस्सल मालवणी चिकन सागुती

Prep Time: 30 minutes

Cook Time: 40 minutes

Total Time: 1 hour, 10 minutes

Category: Curry Recipes : Chicken Curry

Cuisine: Malvani Cuisine

अस्सल मालवणी चिकन सागुती

इंटरनेट आल्यापासून आपल्या ज्ञानात भर पडत चाललेली आहे पण त्यात भेसळही वाढत चाललेली आहे. उदाहरणार्थ काही परप्रांतीय लोक मालवणी पाककृती मोठ्या अधिकारवाणीने सादर करतात. परंतु अस्सल मालवणी मच्छी कढीत काजूगर किंवा सागुती मध्ये टोमाटो वापरले जात नाहीत याची त्यांना कल्पनाही नसते. इथे दिलेली मालवणी सागुतीची कृती ही आजी कडून आईकडे आणि पुढे आई कडून मुलीकडे चालत आलेली पारंपारिक कृती आहे. नेमका फरक कळण्यासाठी स्वत: एकदा घरच्या घरी ही कृती नक्की करून पहा.

  साहित्य
 • गावठी (देशी) कोंबडी - १ किलो
 • चांगला नारळ - १
 • किसलेले सुके खोबरे - १ वाटी
 • मध्यम आकाराचे कांदे - ६
 • खोबरेल तेल - १ मध्यम वाटी
 • मालवणी भाजका मसाला - ६ ते ७ चमचे
 • हळद पूड - १ चमचा
 • धणे - अर्धी वाटी - ६ चमचे
 • बडीशेप - २ चमचे
 • मिरी - अर्धा चमचा
 • लवंग - अर्धा चमचा
 • जायपत्री - अर्धा चमचा
 • खसखस - २ चमचे
 • दालचिनी - १ इंच
 • चक्रीफुल - १ ते २
 • जायफळ- अर्धे
 • हिरवी वेलची - ४
 • मासला वेलची - २
 • आले - २ इंच
 • मीठ (चावी नुसार) - ५ चमचे
  पूर्व तयारी
 • प्रथम नारळ फोडून बारीक किसून घ्यावा.
 • कोंबडीचे मध्यम (साधारण १ इंच) आकाराचे तुकडे करून स्वच्छ धुऊन नंतर निथळून घ्यावेत.
 • नंतर अगदी थोड्या पाण्यात अर्धा चमचा मीठ, हळद पूड, थोडे ओले खोबरे व आले यांचे वाटण करून या तुकड्यांना लाऊन ठेवावे.
 • ३ कांदे बारीक उभे चिरावेत आणि उरलेले कांदे फोडणीसाठी बारीक चौकोनी चिरून ठेवावेत.
  कृती
 • किसलेले सुके खोबरे सर्व साबूत मसाला - धणे, बडीशेप, मिरी, लवंग, जायपत्री, खसखस, दालचिनी, चक्रीफुल, जायफळ, हिरवी वेलची, मासला वेलची थोड्याशा तेलावर एकत्र भाजून बारीक वाटण करावे.
 • उभा चिरलेला कांदा व नारळाचे खोबरे एकत्र खमंग भाजून बारीक वाटण करावे.
 • जाड बुडाच्या पातेल्यात खोबरेल तेलाची फोडणी करून त्यात फोडणी साठीचा कांदा परतून घ्यावा.
 • सर्व भाजका मासला व सुक्या खोबऱ्याचे निम्मे वाटण कोंबडीच्या तुकड्यांना लाऊन वरील फोडणीत हे तुकडे खरपूस परतून घ्यावेत.
 • नंतर ५ ते ६ वाट्या कडकडीत गरम पाणी त्यात घालून घट्ट झाकण लावावे व १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावे.
 • मधून ढवळत रहावे.
 • नीट शिजल्यावर ओल्या नारळाचे वाटण व उरलेले सुक्या खोबऱ्याचे वाटण आणि मीठ घालून परत ५ - १० मिनिटे शिजू द्यावे.
 • आवश्यकते नुसार किंवा वाढवण्यासाठी पुन्हा गरम पाणी व मीठ घालावे.
 • आवडत असल्यास एक वाटी ओल्या खोबऱ्याचा रस घालावा.
 • वरून कोथिंबीर चिरून घालावी.

सूचना:
कोंबडी गावठी (देशी) असावी. ब्रोयलर नको.
मेरीनेशन साठी लिंबू - दही वगैरे मुळीच वापरू नये.
यात टोमाटोचा वापर करू नये,
मालवणी चिकन सागुती शिजवण्यासाठी कडकडीत गरम पाणीच वापरावे.

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

http://malvani.com/real-malvani-chicken-saguti-recipe/

सागुती सोबत वडे सुद्धा करायला शिका

आंबोळी – खापरोळी

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.

Latest posts by Maai (see all)

अस्सल मालवणी चिकन सागुती पाककृती
Tagged on: