सुका बांगडा – जोवल्याची मालवणी चटणी

सुका बांगडा – जोवल्याची मालवणी चटणी

मोठ्या पावसात बरेचदा मासे मिळणं दुरापास्त होतं अशावेळी समुद्राच्या माशांची चटक असलेल्या बहुसंख्य मालवणी लोकांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. मे महिन्याच्या बाजारातून आणलेले सुके बांगडे किवा जोवला (sukat jovla/jowala/suka bagnda) यांची मग आठवण येते. डाळ-भात आणि चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेला सुका बांगडा अशी दुपारच्या जेवणाची तयारी होते

मालवणी बांगड्याचे तिकले

मालवणी बांगड्याचे तिकले

केवळ ताज्या नारळाच्या जाडसर चटणीत शिजवलेले बांगड्याचे तिकले / तीखले (fish masaka) आणि गरमागरम भाकरी वा चपाती ही आणखीन एक तोंडात पाणी आणणारी मालवणी पाककृती आहे. कोकण पट्टयात निव्वळ बांगड्याच्याच १५-२० पाककृती आढळतील.