कोळंबी कालवण – मालवणी स्टायल

कोळंबी कालवण – मालवणी स्टायल

मालवणी जेवणात कोळंबी कालवण – kolambi kalvan – या पदार्थाचे बरेच प्रकार चाखायला मिळू मिळतात. त्यापैकीच कोळंबीची मालवणी गरम मसाल्याची कढी (आमटी) हा एक लोकप्रिय प्रकार आहे. कोळंबी घेताना पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची असावी. पण लाल कोळंबी बहुतांशी वातूळ असते. कोळंबीच्या या प्रकारच्या आमटीत अगदी थोड्या प्रमाणात वापरलेले बटाटे व शेवग्याच्या शेंगा एक वेगळीच लज्जत आणतात.

सुका बांगडा – जोवल्याची मालवणी चटणी

सुका बांगडा – जोवल्याची मालवणी चटणी

मोठ्या पावसात बरेचदा मासे मिळणं दुरापास्त होतं अशावेळी समुद्राच्या माशांची चटक असलेल्या बहुसंख्य मालवणी लोकांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. मे महिन्याच्या बाजारातून आणलेले सुके बांगडे किवा जोवला (sukat jovla/jowala/suka bagnda) यांची मग आठवण येते. डाळ-भात आणि चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेला सुका बांगडा अशी दुपारच्या जेवणाची तयारी होते

मालवणी कोळंबी फ्राय – kolambi fry

मालवणी कोळंबी फ्राय – kolambi fry

कोळंबी अर्थात prown – kolambi साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा तव्यावर भाजून काढायला अगदी थोडा वेळ लागतो. काळ्या रंगाची कोळंबी चवदार असते. तव्यावर दीड ते दोन मिनिटे दोन्ही बाजूनी तळावे. जास्त वेळ तळू नये अन्यथा रबरा प्रमाणे चिवटपणा व करपटपणा येतो.

वाफवलेले मालवणी बांगडे

वाफवलेले मालवणी बांगडे

वाफवलेले मालवणी बांगडे (steam cooked mackerel) या प्रकारात तेलाचा वापर मुळीच केला जात नाही तसेच या प्रकारे शिजवलेले मासे फ्रीज मध्ये न ठेवताही २-३ दिवस चांगले राहतात. समुद्र किनाऱ्यापासून खूपच दूर असलेल्या कोकणातील खेडेगावांमध्ये पूर्वी खूपच लोकप्रिय होती. जगभरात मासे टिकवण्याचे आणि शिजवण्याचे अनेक प्रकार आहेत. जसे smoking, baking, frying, grilling, poaching, steaming इत्यादी.

मालवणी बांगड्याचे तिकले

मालवणी बांगड्याचे तिकले

केवळ ताज्या नारळाच्या जाडसर चटणीत शिजवलेले बांगड्याचे तिकले / तीखले (fish masaka) आणि गरमागरम भाकरी वा चपाती ही आणखीन एक तोंडात पाणी आणणारी मालवणी पाककृती आहे. कोकण पट्टयात निव्वळ बांगड्याच्याच १५-२० पाककृती आढळतील.

मालवणी मच्छी कढी

मालवणी मच्छी कढी

कढी मधील पाणी आवश्यकतेनुसार वाढवून मीठ टाकावे व गरज वाटल्यास लाल तिखट टाकावे. कोथींबीरीची पाने टाकून मंद ग्यासवर एक-दोन उकळ्या काढाव्यात. जास्त उकळू नये, अन्यथा मिश्रण फुटून उतू जाण्याची शक्यता असते. मालवणी मच्छी कढी जेवताना भाताचा अक्षरश: फडशा पडतो.