माझ्या  बद्दल थोडक्यात:
१९८७ साली गोवा शिपयार्ड च्या नोकरीत प्रथमच कॉम्पुटर हाताळला. तेव्हापासून कॉम्पुटरचं वेडच लागलं. त्या नंतर अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या आणि धंदेही केले. पूर्वी वडिलांच्या नोकरीत होणाऱ्या बदलीमुळे शाळा – कॉलेजही सतत बदलत राहिली. परिणामी एक कॉम्पुटर सोडला तर जिवाभावाची मित्र मंडळी जोडूच शकलो नाही.

आता निदान मालवणी डॉट कॉम च्या निमित्ताने कोकणच्या माणसाशी आणि मातीशी स्वताला जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

मालवणी.कॉम चा हेतू:
इमेल, चाटींग व युट्युब व्हिडीओ याच्या पलीकडेही इंटरनेट वर बरंच काही आहे ज्याचा उपयोग बरेच लोक आपला व्यवसाय, कला व ज्ञान वृद्धी साठी अक्कल हुशारीने करून झपाट्याने प्रगती करत आहेत. सर्वसामान्य कोकणी माणसालाही सहजपणे स्वत:च्या भाषेत साइटचा वापर करता यावा व इंटरनेट द्वारे जगभर पसरलेल्या माहिती व तंत्रज्ञानाच्या अफाट विश्वाचा सार्थ उपयोग व्हावा असे मला नेहमीच वाटते.

मालवणी.कॉम व्दारे कोकणी माणसाच्या प्रगतीला माझाही हातभार लागावा ही इच्छा!!!

btw, it’s a time for shameless self promotion!!!

I am a web designer though interested more in SEO and SEM. I am passionate about  Natya Sangeet, Writing and about Malvani off course.

धन्यवाद
नाना