जमीन खरेदी नंतर सातबारा आपल्या नावे केव्हा होतो,
खरेदीखत (sale-deed),  जमीन विक्री पूर्ण केल्यानंतर होते. खरेदीखत झाल्यानंतर काही दिवसातच दुय्यम निबंधक (sub-registrar) कार्यालयातून अविवरण पत्रक  तहसीलदार कार्यालयात  पाठविले जातात. त्यानंतर संबधित तलाठी कार्यालयात हे विवरण पत्रक पाठविले जातात. त्यानंतर तलाठी सातबारा वरील सर्वांना नोटीसा काढतात. नोटीस सही करून अल्यानंतर सातबारा वरील जुनी नावे कमी होऊन नवीन मालकांची नावे नोंदाविली जातात.

वर्ग २ च्या विक्रीची परवानगी

सातबारा वर जमिनिचा प्रकार यामध्ये वर्ग १ असा उल्लेख असेल तर प्रांत अधिकारी यांची परवानगीची आवश्यकता नसते. परंतु वर्ग २ असे असल्यास परवानगीची आवश्यकता असते. कारण अशा जमिनी भोगवटदाराला केवळ कसण्याचा अधिकार असतो विकण्याचा नसतो. सदर भोगवटदार हा या जमिनिचा कुळ  म्हणून असतो. ही जमीन कुळकायदयाने मिळालेली असते थोडक्यात या जमिनी म्हणजे सरकारी मालमत्ता असतात. अशा जमिनीच्या विक्रीच्या परवानगी साठी  प्रांत ऑफिंस मध्ये खालील कागदपत्रांची पुर्तता करावी लागते.

 1. जमिनीचा नवीन सातबारा
 2. जमिनीवरील सर्व फेरफार
 3. आठ अ
 4. जमीनीचा नकाशा
 5. अर्ज

अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून प्रांत ऑफिस मध्ये दाखल करावेत. सर्व कागदपत्रांची छाननी करून एका महिन्यात प्रांत ऑफिसरच्या परवानगीची प्रत मिळते. मिळालेल्या परवनगी मध्ये फक्त सहा महिन्याचा कलावधी असतो. सहा महिन्यात जमीन विक्री करावी लागते अथवा सहा महिन्यांनी ही परवानगी संपते.

बिनशेती जमीन (Non Agricultural land- NA )

कोणत्याही जमिनी मध्ये घर बांधावयाचे झाल्यास ती जमीन प्रथम बिनशेती (NA) करावी लागते. शेत जमीन आणि इतर काही प्रकारच्या जमिनीमध्ये घर बांधता येंत नाही. जर शेत घर बांधावयाचे असल्यास स्वतः शेतकरी असावे लागते. त्याचप्रमाणे आपल्या शेत जमिनी असाव्या लागतात आणि ती शेती करावी लागते. आणि तसे पुरावे असावे लागतात. जमीन बिनशेती करायची असल्यास  पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते.

 1. जमिनीचा सातबारा
 2. जमिनिचा नकाशा
 3. टाउन प्लानिंगची परवानगी
 4. अर्ज

सदर अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून संबधित प्रांत अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयात सदर करावे लागतात. जमिनीच्या नकाशामध्ये लागून रस्ते असल्यास अडचण येंत नाही पण तसे नसेल तर घरापर्यंत जण्याकरीता रस्ता दाखवावा लगतो. म्हणजेच सदर जमनीपर्यंत जाण्यासाठी रस्त्यासाठी जमीन विकत घ्यवी लागते.

खरेदीखत कसे करावे.

खरेदीखत  (sale-deed) म्हणजे जमिनीचा व्यवहार पूर्ण केल्याच पुरावा असतो.

खरेदिखत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणार्‍याने जमीन मालकाला ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम पूर्ण करायची असते. जर सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदीखत करू नये. कारण एकदा खरेदीखत झाले की नंतरचा  जमीन मालक हा त्या जमिनीवरचा मालकी हक्क काढून घेत असतो. आणि खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. खरेदिखत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो. पण तसे मोठे पुरावे असावे लागतात. खरेदीखताची नोंदणी (registration) संबंधित दुय्यम निबंधक (sub-registrar)  कर्यालयात झाल्यानंतर काही दिवसातच सातबारा नवीन मालकाच्या नावे होतो.

खरेदीखत करण्यासाठी ज्या गावातील जमीन असेल त्या संबधित दुय्यम निबंधक कार्याकायात जाऊन बाजारभावे आणि आपपसातील
ठरलेल्या रक्कमेवर मुल्यांकन करून मुद्रांक शुल्क (stamp paper) काढून घ्यावे. जमिनीचे मुल्यांकन हे जमिनीच्या प्रकाराप्रमाणे ठरलेले असते. आणि त्याचे सर्व दरपत्रक (रेडीरेकनर) त्या त्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असतात. आणि मुल्यांकन काढून देण्याचे काम हे दुय्यम निबंधाकाचेच  असते. यामध्ये जमिनीची सरकारी किंमत आणि प्रत्यक्ष जमीन मालक व खरेदीदार यांच्यातील ठरलेल्या व्यवहारावर जी रक्कम जास्त असते त्यावर मुल्यांकन करून जास्त मुद्रांकशुल्क गृहीत धरला जातो.

मुद्रांक शुल्क (stamp paper) काढून झाल्यावर दुय्यम निबंधक हे खरेदीखत दस्तऐवजासाठी लागणारे नोंदणीशुल्क (registration fee)कागदपत्रे व इतर कार्यालयीन खर्चाची माहिती देतात. ही सर्व माहिती घेऊन दुय्यम निबंधक यांनी ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर आवश्यक ती माहिती लिहून उदा. सर्वे नं. जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमीन मालकांची नावे, जमीन खरेदी करण-याचे प्रयोजन त्याचप्रमाणे जमीन विकण्याचे प्रयोजन नमूद करावे लागते. तसेच लागणारी सर्व कागदपत्रे जोडून खरेदीखत तयार करावे. यासोबत संगणकावर डाटाएंट्री करण्यसाठी लागणारा input भरून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी सदर करावा.

खरेदीखत करणे साठी लागणारी कागदपत्रे

 1. सातबारा
 2. मुद्रांकशुल्क
 3. आवश्यक असल्यास फेरफार
 4. आठ अ
 5. मुद्रांक शुल्काची पावती
 6. दोन ओळखीच्या व्यक्ती, त्यांचे फोटो प्रुफ
 7. आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र
 8. N A order ची प्रत

जमीन खरेदी करताना किमान या बाबी अवश्य ध्यानात ठेवा तसेच वेळोवेळी बदलणारे संबधित नियम व कायदे यांची माहिती घ्या.

…..अमिता

जमीन खरेदी करताना

खरेदीखत करणेसाठी महत्वाची माहिती
Tagged on: