प्रिय मित्र – मैत्रिणी
रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसऊन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसऊन
निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला
नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार
एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत
हार मानली की सारंच संपलं
जिंकण्यासाठी लढायलाच हवं
मरण तर काय क्षणाचा खेळ
जगण्यासाठी झगडायलाच हव
Latest posts by saritap (see all)
- आठवणीतले मालवणी पदार्थ - August 24, 2016
- प्रिय मित्र – मैत्रिणी - August 8, 2016
प्रिय मित्र – मैत्रिणी