कोळंबी फ्राय – tava fried kolambi
Category मालवणी पाककला
कोळंबी (prawn - kolambi) साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा तव्यावर भाजून काढायला अगदी थोडा वेळ लागतो. समुद्रापेक्षा खाडीतील काळसर रंगाची सुंगटे जास्त चवदार असते. मालवण पट्टयात सुंगटे तेलात तळून काढण्या पेक्षा तव्यावर थोड्याशा तेलात परतून काढणेच अधिक पसंत केले जाते. या प्रकारे भाजलेली कोळंबी ताटात पडताच भूकेला निमंत्रण मिळते.
Notes
Recipe by: Maai
....(Please do Rate/Like/Share this recipe.)
Ingredients
साहित्य:
- २०-२५ मध्यम आकाराची सुंगटे - साफ केलेली
- २ लसूण पाकळ्या
- पाव इंच आले (चवी नुसार)
- ३ टीस्पून लाल तीखट (चवी नुसार)
- हळद चीमुटभर
- चिंचेच पाणी
- १ टीस्पून मालवणी गरम मसाला (चवी नुसार)
- २ वाट्या तांदळाचे पीठ
- तेल तळण्या पुरते
- मीठ चवीप्रामाणे
- क्लिक करा अमेझॉन वर मालवणी गरम मसाला खरेदी साठी.....
Instructions
तवा फ्रायड कोळंबी कृती:
- प्रथम कोळंबी साफ करून घ्या.
- मग सर्व मसाले, १ वाटी तांदळाचे पीठ, हळद, चिंचेचे पाणी व मीठ जाडसर चटणी प्रमाणे एकत्र कालउन घ्या.
- एका डिश मध्ये तांदळाचे कोरडे पीठ घ्या. कोलंबीच्या प्रत्येक नागाला बाहेरून या चटणीचे आवरण लाऊन वरून तांदळाचे कोरडे पीठ भुरभुरावे
- तव्यावर दीड ते दोन मिनिटे दोन्ही बाजूनी थोड्याशाच तेलात तळावे.
- कोळंबी जास्त वेळ तळू नये अन्यथा रबरा प्रमाणे चिवटपणा व करपटपणा येतो.
© 2021 Copyright © 2018 malvani.com
Latest posts by Maai (see all)
- Patoli recipe – rice flour – coconut sweet dish - March 29, 2018
- Malvani Black peas curry recipe (Usal) - March 28, 2018
- Nachani satu – Raagi sweet cakes recipe - March 27, 2018
मालवणी कोळंबी फ्राय – kolambi fry