समुद्राच्या माश्यांना मागणी प्रचंड आणि पुरवठा कमी असल्याने दर कायमच तेजीत असतात. मासे घेताना योग्य ती माहिती असेल तर आपल्याला पैशाचा योग्य मोबदला आणि खाल्ल्याचे समाधान मिळते. या साठी प्राथमिक पण आवश्यक माहिती मी इथे देत आहे. आशा करतो की निदान काही लोकांना तरी ती उपयुक्त ठरेल. मासे विक्रेत्यांना ही माहिती बहुधा मुळीच आवडणार नाही.

ताज्या माशाचे कल्ले उघडून पहा
ताज्या माशाचे कल्ले आतून गुलाबी किंवा लालबुंद असतात.

wikipedia.org मधील माहिती नुसार भारताला ७,५१६.६ कि.मी. लांबीचा भला प्रचंड समुद्र किनारा लाभला आहे. सुदैवाने कोकणच्या वाट्याला यातील बराच भाग आलेला आहे. किनारपट्टी पासून पुढील ३०-३५ कि.मी. आतल्या भाग पर्यंत मुख्य अन्न म्हणजे मासळी भात! आता तर अगदी सह्याद्रीच्या पायथ्या पर्यंत रिक्शा, टेम्पोने रोजच्या रोज मासे पोचतात. समुद्रातील माशांची महतीच अशी आहे की कोल्हापूर. पुणे अशा दूर दूरच्या शहरात सुद्धा मागणी वाढतच चाललेली आहे.

ताज्या माशाचे डोळे पहा
ताज्या माशाचे डोळे चकचकीत काळेभोर असतील.

किनारपट्टीच्या नजीकचे लोक मासे खरेदीत अतिशय चोखंदळ असतात. मासे अगदी ताजे ताजेच पाहून घेतात आणि मासळी मार्केटात पाय ठेवताना त्यांची यादी बहुधा ठरलेली असते. हे नाही तर ते  – अशी  दर आणि उपल्ब्धेते नुसार प्राथमिकता बदलते. सारंगा, पापलेट, इस्वन, मोठी सुंगटे भाजण्यासाठी आणि बांगडे चटणीसाठी, छोटी सुंगटे, पेडवे, खापी कढीसाठी वगैरे, वगैरे. तर बळे, टोकी, बुगडे, हाडे, शेंगाट असे काही प्रकार अगदीच कमी प्रतीचे मानले जातात. जसे हापूस, पायरी, मानकूर, केसर सोडून उरलेले इतर आंबे. सिझनमध्ये बहुधा सर्वांनाच मनासारखे मासे मिळतात. पण इथे असेही लोक आहेत जे मासळी नसेल तर जेवतच नाहीत. पावसाळ्यात त्यांची बरेचदा मोठी पंचाईत होते. अशा लोकांना शकाहर सोडाच  कोंबडी, मटण किंवा नदीचे मासे सुद्धा चालत नाहीत.

लकाकणारे ताजे mase
ताजे मासे बाहेरून चकचकीत तजेलदार दिसतील.

या उलट समुद्रापासून दूरअसलेल्या ठिकाणी मासे पोचे पर्यंत त्यांचा ताजेपणा निघून जातो. बर्फामुळे फक्त ते जास्त खराब होत नाहीत एवढच! अशा ठिकाणी मग काय असेल ते घेण्या पलीकडे मोठासा पर्याय नसतो. खूप पूर्वी मी पुण्याला पाहिलंय शेंगाट मासा सुरमई म्हणून खपवतात तर बुगडे मासा सुळे म्हणून खपवतात. खरे तर गुणवत्तेत व दरात सुरमई आणि सुळे, शेंगाट – बुगडे यांच्या पेक्षा कीती तरी वरच्या पायरीवर, पण काही लोकांची फसगत होतेच. अशी फसवणूक टाळण्या साठी पुढील माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल.

 

 

 

काही ठिकाणी विक्रेते लोक यातील काही Tests अगदी रोजच्या ग्राहकालाही सहजासहजी करू देणार नाहीत.

मासे ताजे आहेत हे कसे ओळखावे ?

  • दिसण्यातला ताजेपणा : ताजे मासे दिसायला ताज्या फुलांप्रमाणे तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात. थोडेसेही मरगळलेले असले तर शंकेस वाव असतो.
  • वासावरून ओळख : काही ताज्या माशांना किंचित हिंवस वास असला तरी घाण कुजकट वास येत नाही.
  • ढिगातील मासे : खराब मासे काही वेळा ताज्या माश्यांच्या ढिगात मिसळून विकले जातात. या प्रकारात कुजकट वास आणि मरगळलेले मासे ओळखणे केवळ साधने अंतीच शक्य होते.
  • बोटाने दाबून पहा : मासा ताजा नसेल तर बोटाने थोडासा दाब दिल्यावर तिथे खोलगट ठसा उमटतो. ताज्या माश्यात असं होत नाही.
  • माशाचे डोळे पहा : ताज्या माश्याचे डोळे चकचकीत काळेभोर आणि पारदर्शक दिसतील. लालसर किंवा धुरकट पांढरे मुळीच नसावेत.
  • तुकडे व काप यांचा रंग : काही मासे कापं पाडून विकले जातात. ताज्या माशांचे तुकडे दिसायला व्यवस्थित असतात व त्यावर पारदर्शक पांढऱ्या रंगाची झाक असते.
  • कल्ले उघडून पहा : ताज्या माशाचे कल्ले थोडेसे उघडून पाहिल्यास आतमधून बऱ्यापैकी लाल किंवा गुलाबी दिसतील. ते जर फिकट असले तर ताजेपणा संपलेला आहे. फसवण्यासाठी काही विक्रेते शिळ्या माशांचे कल्ले चक्क रंग लाऊन लाल करतात तरी त्यापासून सावध!
  • खेकडे व चिंगुळ : थोडा वेळ निरखून पाहिल्यास ताजे खेकडे व चिंगुळ यांची मंद हालचाल होत असल्याचे दिसेल. म्हणजे ते जिवंत असतानाच घ्यावेत.
  • तिसरे व खुबे : ताजे तिसरे व खुबे यांची कवचं गच्च बंद असतील व त्यात मुळीच gap दिसणार नाही.

भारताबाहेर मलेशिया – सिंगापूर इथे मिळणारे मासे बरेचसे इथल्या प्रमाणेच असतात, पण युरोपमध्ये तसं नाही. बरेचदा ते ओळखू येत नसायचे. Manchester च्या Bolton इथल्या मासळी मार्केटात ” Bombay Fish Market ” नावाचं एका गोऱ्याच दुकान होतं. शनिवारी तेथे चक्क भारतातून विमानाने आलेले पापलेट, सरंगा, सौन्दाले, इर्डा, वाघी सुंगटा असे बऱ्यापैकी चांगले मासे मिळायचे आणि दूर दुरहून आलेल्या भारतीय लोकांची मग गर्दी व्हायची. दर गंमतशीर असायचे – काही घेतलं तरी £9 किलो प्रमाणे. तिथले गोरे आणि ब्रिटीश भारतीय, तिथली लोकल मासळी किंवा मॉल मधली फ्रोझन मासळी पसंत करतात. तेही एक बरंच होतं!

बोल्टन फिश मार्केट
क्रिसमसच्या दिवसांतील बोल्टन फिश मार्केट

बाकी सर्व ठीक आहे ना? may God bless you. या पुढील मासळीसाठी wish you all the best!

#१

Correct! Wrong!

#२

Correct! Wrong!

#३

Correct! Wrong!

#४

Correct! Wrong!

#५

Correct! Wrong!

#६

Correct! Wrong!

#७

Correct! Wrong!

#८

Correct! Wrong!

#९

Correct! Wrong!

#१०

Correct! Wrong!

#११

Correct! Wrong!

#१२

Correct! Wrong!

#१३

Correct! Wrong!

#१४

Correct! Wrong!

#१५

Correct! Wrong!

#१६

Correct! Wrong!

#१७

Correct! Wrong!

#१८

Correct! Wrong!

#१९

Correct! Wrong!

#२०

Correct! Wrong!

#२१

Correct! Wrong!

#२२

Correct! Wrong!

#२३

Correct! Wrong!

#२४

Correct! Wrong!

#२५

Correct! Wrong!

#२६

Correct! Wrong!

#२७

Correct! Wrong!

#२८

Correct! Wrong!

#२९

Correct! Wrong!

#३०

Correct! Wrong!

#३१

Correct! Wrong!

#३२

Correct! Wrong!

#३३

Correct! Wrong!

#३४

Correct! Wrong!

#३५

Correct! Wrong!

#३६

Correct! Wrong!

#३७

Correct! Wrong!

#३८

Correct! Wrong!

#३९

Correct! Wrong!

#४०

Correct! Wrong!

#४१

Correct! Wrong!

#४२

Correct! Wrong!

#४३

Correct! Wrong!

#४४

Correct! Wrong!

#४५

Correct! Wrong!

#४६

Correct! Wrong!

आपण यांना ओळखता का?
किती मासे बरोबर ओळखले?

Related recipes:

Malvani macchi kadhi – Fish curry
Malvani Bangada Tikhla: Fish masala
Malvani Steam cooked mackerel
Malvani Kolambi Fry – Prawns fry
Dried Mackarel – prawns Malvani chutney
Kolambi Kalvan – Malvani Prawns curry

येता का मासळी मार्केटात ?