मालवणी बांगड्याचे तिकले - fish masala
Category मालवणी पाककला
माशाच्या कढी प्रमाणे जास्त पाणी न ठेवता केवळ ताज्या नारळाच्या जाडसर चटणीत शिजवलेले बांगड्याचे तिकले / तीखले (fish masaka / bangda masala) आणि गरमागरम भाकरी वा चपाती ही आणखीन एक तोंडात पाणी आणणारी मालवणी पाककृती आहे. कोकण पट्टयात निव्वळ बांगड्याच्याच १५-२० पाककृती आढळतील.
Notes
Recipe by: Maai
....(Please do Rate/Like/Share this recipe.)
Ingredients
साहित्य:
- ७-८ ताजे बांगडे तुकडे करून घ्यावेत
- ८-१० सुक्या मिरच्या किवा हिरवा मसाला (मिर्ची पावडर) ४ टेबलस्पून
- धने १ टेबलस्पून
- ४ तिरफळे
- ४-५ आमसुले (कोकम)
- तेल फोडणीसाठी
- मीठ चवीनुसार
- हळद चिमुटभर
- १ ताजा नारळ
- मोहरी अर्धा टेबलस्पून
- १ कांदा.
- क्लिक करा अमेझॉन वर कोकम खरेदी साठी.....
Instructions
बांगड्याचे टिकले - कृती:
- प्रथम ओळ नारळ खवून घ्यावा,
- खववलेले खोबरे सुक्या मिरचीचे तुकडे अथवा मिर्ची पावडर, हळद व धने मिक्सरला बारीक वाटून घ्यावेत.
- एका पातेल्यात मोहरी व बारीक चिरलेल्या कांद्याची तेलावर टाकून फोडणी द्यावी.
- कांदा लालसर होताच त्यामध्ये बांगड्याचे तुकडे टाकावेत व लगेच मिक्सर मधील वाटप, तिरफळे व आमसुले (कोकम) घालावीत.
- कढीप्रमाणे पाणी जास्त न घालता सैल होण्यापुरते पाणी घालून जाडसरपणा टिकउन शिजू द्यावे.
- एक उकळी आल्यावर उतरवावे.
- बांगड्याचे तिकले गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर खावे.
© 2021 Copyright © 2018 malvani.com
Latest posts by Maai (see all)
- Patoli recipe – rice flour – coconut sweet dish - March 29, 2018
- Malvani Black peas curry recipe (Usal) - March 28, 2018
- Nachani satu – Raagi sweet cakes recipe - March 27, 2018
मालवणी बांगड्याचे तिकले