मालवणी डाळ भात - Dal-bhat Recipe

Prep Time: 20 minutes

Cook Time: 20 minutes

मालवणी डाळ भात - Dal-bhat Recipe

मालवणी डाळ भात dal-bhat सिंधुदुर्गाला प्राप्त असलेला समुद्र किनारा यामुळे येथील मुख्य अन्न भात आणि मासे (माश्याचे सार) सोबत फ्राय केलेला मासा. पण इथे डाळ भात (dla bhat) खाणारे लोकही आहेत. समुद्र्किनारा म्हट्लं की मोठ्मोठ्या नारळाच्या (माडाच्या) बागा. सिंधुदुर्गातही त्याचप्र्माणे आहे येथे जेवणातील कोणत्याही पदार्थात ओल्या नारळाचे खोबरे वापरल्याशिवाय ते जेवण रुचकर नाही असे समजले जाते. येथे भाताचे पीक घेतले जाते याव्यतीरीक्त येथील जमिनी अन्य चांगले पीक देत नाहीत. मुबलक प्रमाणात मिळ्णारे मासे व तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथील अन्न भात व मासे.

  मालवणी डाळ साहीत्य:
 • १ वाटी तुरडाळ
 • ४-५ हीरव्या मिरच्या
 • १ वाटी ओल्या नारळाचे खवलेलं खोबरे,
 • हळद
 • १ टोम्याटो कीवा आमसुले/चिंच
 • मिठ
 • फोडणीसाठी हींग
 • मोहरी
 • जीरे
 • तेल
 • असल्यास कढीपत्ता
  भात साहीत्य -
 • दोन वाट्या तांदुळ
 • चार वाट्या पाणी
  मालवणी डाळ - कृती:
 • प्रथम तुरडाळ ओली मिरची, टोम्याटो कुकरमधुन शिजवुन घ्यावेत.
 • नंतर हळद व ओले खोबरे मिक्सर म्ध्ये बारीक करुन घ्यावे.
 • एका पतेल्या मध्ये फोड्णीसाठी तेल टाकुन तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे, कढीपत्ता, मोहरी, हींग घालावेत.
 • फोडणी तडतड्ल्यावर त्यात बारीक केलेले खोबरे शिजवलेली डाळ ओतावी.
 • डाळिला उकळी आल्यावर दोन ते तीन मिनीटांनी ग्यास बंद करावा. डाळ तायार झाली.
 • ही डाळ भाताबरोबर खाण्यास घावी डाळव भात त्याबरोबर एखादि तीख्ट भाजी कीवा उसळ लोणचे पापड घ्यावेत.
  भात कृती:
 • तांदुळ साफ करुन धुवुन घ्यावेत.
 • नंतर एका पातेल्यात पाणि व तांदुळ घालुन गॅस वर ठेवावे उकळी आल्यावर गॅस थोडा कमी करावा.
 • थोड्या वेळात तांदुळ पाण्याबरोबर येतील, तांदुळ अर्धे शिजले्ले असतील.
 • थोड्या वेळात भात शिजलेला असेल आता भातात किंचीत पाणि असेल.
 • भात मुरण्यासाठी ठेवावा. मुरण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे.
 • थोड्या वेळाने झाकन काढुन भातावर कावीलता / पलिता मारावा. दब दब असा आवाज आल्यास भात तयार झाला.
 • शुध्द मासाहारी लोकांनी सुद्धा कधी कधी डाळ भात लिम्बाच लोणचं खायला हरकत नाही.

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

https://malvani.com/malvani-dal-bhat-recipe/

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.
मालवणी डाळ भात
Tagged on: