नेमकं वर्मावर बोट ठेवणाऱ्या मालवणी म्हणी:

मालवणी म्हणी जरी बोचक आणि खोचक असल्या तरीही त्या ऐकून हसू फुटतच.

 • आकाडता बापडा, सात माझी कापडा – स्वतः जवळ असलेल्या थोड्याश्या मालमत्तेचे/हुशारीचे/कलेचे प्रदर्शन माडंणे.
 • आयत्यार कोयत्ये – (कोयता=एक ह्त्यार) दुसर्‍यच्या श्रमाचे श्रेय लाटणे.
 • आळशी उटाक आनी शिमरा शिंकाक – आळशी मनुष्य काम टाळण्यासाठी निमित्त शोधतच असतो.
 • इतभर तौसा नी हातभर बी – (तौसा=काकडी)
 • कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी – (आरी=एक हत्यार) आपल्या निष्काळजीपणा बद्दल इतरानां जबाबदार धरणे.
 • कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी – परस्पर संबंध नसतानाही एखादी जबाबदारी अंगावर येऊन पडणे.
 • खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच – जावई कंपनी खरोखरच एवढी कृतघ्न असते का?
 • खांद्यार बसयलो तर कानात मुतता – मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेणे.
 • खुळा भांडता वझरा वांगडा – (वझर=पाण्याचा छोटा झरा)निरर्थक भांडण.
 • खेकट्याक मेकटा – जशास तसे.
 • गजालीन खाल्लो घोव – गप्पागोष्टी रंगात आल्यामुळे महत्वाच्या कामांचा विसर पडणे.
 • गाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी? – (गाबीत=कोळी समाज; गोरवा=गुरे; भट=ब्राम्हण; तारवा=गलबत) न जमणार्‍या कामाला हात घालण्यात शहाणपणा नसतो.
 • गावता फुकट भाकरी तर कित्याक करु चाकरी – तुम्हीपण किमान अशा एकाला तरी ओळखत असालच.
 • गावला तेचा फावला – (गावला=मिळालं; फावला=फायदा झाला)
 • गावात लगीन नी कुत्र्याक बोवाळ – निमंत्रणा शिवाय कार्यक्रमात सहभाग घेऊन पुढे पुढे करणे.
 • चुकला माकला ढॉर धामपुरच्या तळ्यात – (ढॉर=गाय/बैल)
 • तुका नको माका नको घाल कुत्र्याक – दोघांच्या भाडंणाचा लाभ तिसर्‍यालाच होणे.
 • दिसला मडा, इला रडा – (मडा=प्रेत) इतरानां त्रासदायक ठरणारी सवय/खोड.

मालवणी म्हणी malvani-mhani

मालवणी म्हणी भाग २

 • देणगे सारख्या घोरीप – (घोरीप=नाटक) मानधना नुसार नाटक रंगते.
 • नदी आधी व्हाणो, कढलल्यो बर्‍यो – (व्हाणो=वहाण) संकटाची चाहूल लागताच योग्य ती खबरदारी घ्यावी.
 • नाय देवच्या भाषेक बोंडगीचे वाशे – (बोंडगी=निरुपयोगी झाड; वाशे=छपरासाठी लागणारे लांब व मजबूत लाकूड) सरळ नकार न देता पोकळ आश्वासन देणे.
 • नालकार रडता म्हणान त्यालकार रडता – (नालकार=नारळवाला; त्यालकार=तेली).
 • पादर्‍याक निमीत पावट्याचा – (पावटे=एक स्फोटक धान्य?) चुक अमान्य करून खोटी कारणं देण्याची सवय.
 • पानयात हगलला काय दडान र्‍हवाचा नाय – सत्य कधीच लपून रहात नाही.
 • पावळेचा पाणी पावळेक जाताला – मुळचे गुणधर्म सहजा सहजी जात नाहीत.
 • पिकला पान घळतलाच – वय झालं की मृत्यु अटळ असतो.
 • पोरांच्या मळणेक बी नाय भात – (मळणी=पिकलेल्या भाताची रोपं शेवटी बैलांकडून तुडऊन घेऊन उरलं सुरलं धान्य मिळवण्याची एक पद्धत) ठराविक कामं जाणकार व्यक्तिकडून करून घेतलेली बरी.
 • भोपळन बाय पसारली नी पाटचे गुण इसारली – थोडीशी प्रतिष्ठा प्रसिद्धी मिळाल्यावर स्वतःची कुकर्मे सोइस्करपणे विसरणे.
 • मिठाक लावा नी माका खावा – प्रत्येक गोष्टीत विनाकारण नाक खुपसण्याची खोड.
 • मेल्ल्या म्हशीक पाच शेर दूध – हयात नसलेल्याची उगाच खोटी स्तुती करणे.
 • मोव थय खोव – (मोव=मधाचे पोळे; खोव=मधमाशा ) फायदा असेल तिथे धाव घेणे.
 • येरे दिसा नी भररे पोटा – कसलीच प्रगती न होता दिनक्रम चालू रहाणे.
 • येवाजलला साधात तर दळीदार कित्याक बाधात – योजना साध्यच न झाल्यास चांगले दिवस कुठून येतील?
 • लिना लिना नी भिकार चिन्हा – (लिना=लिहिणे) पुर्वी शाळेतल्या शिक्षणावर फारसा विश्वास नसायचा.
 • वसाड गावात एरंड बळी – (वसाड=ओसाड, एरंड=उंच वाढणारे उपयोगशून्य झाड) उपलब्धतेनुसार वापर.
 • वेताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव – ओढून ताणून जमलेली जोडी.

मालवणी म्हणी भाग ३

 • सरकारी काम, तीन म्हयने थांब – टेबलाखालून खाणार्‍यांची रांग किती लांब!!
 • सरड्याची धाव वयपुरती – (वय=कुंपण)
 • सात पाच रंभा नी पाण्याचा नाय थेंबा – (रंभा=नटुन थटुन मिरवणार्‍या बायका) सभोवताली कामचुकार माणसेच असतील तर कामं कशी होतील?
 • हयरातय नाय नी माशातय नाय – (हयर=साप सदॄष मासा)
 • हळ्कुंडाच्या पदरात शेळ्कुंड – (हळकुंड=हळदीची कांडी; शेळकुंड=गोवर्‍या) चांगल्याच्या पदरी वाईट पडणे.
 • हात पाय र्‍हवले, काय करु बायले – अगतिक – असहाय्य होणे.
 • हो गे सुने घरासारखी – ज्या लोकां बरोबर रहायच आहे त्यांच्याशी जुळुऊन घेतलेलं योग्य.
 • देणा नाय घेणा आणि कंदिल लावन येणा – नस्ती उठाठेव कित्या करा .
 • करुन गेलो गाव आणि …. चा नाव
 • काप गेला भोका रवली – (काप – कानातलो दागिनो) । वैभव संपले आणि भकास खूणा र्‍हवले.
 • कावळो बसाक फांदी मोडाक – काय योगायोग आसतत बघा.
 • मोठ्या लोकंची वरात आणि हगाक सुद्धा परात
 • हगणार्‍याक नाय तरी बघणार्‍याक होई लाज
 • कापाड न्हेला बायन आणि चींधी नेली गायन – (कापाड – बरी साडी) बरा काय होता तेचो दानधर्म केलो आणि उरलला चोरयेक गेला.
 • गावकारची सुन काय पादत नाय? – गावकार म्हणजे गावातले मानकरी.
 • कपाळार मुकुट आणि खालसुन नागडो – फक्त दिसाकच भपकेदार.
 • कोंबो झाकलो म्हणान उजवाडाचा रव्हत नाय – खरा काय ता भायर येतालाच.
 • दोडकार्‍याचा कपाळात तिनच गुंडे – किती प्रयत्न केलो तरी परिस्थिती काय बदलत नाय.
 • केला तुका – झाला माका

मालवणी म्हणी भाग ४

 • कोको मिटाक जाता मगे पावस येता.
 • करुक गेलं गणपती आणि झाला केडला – (केडला-माकड)
 • कशात काय आणि फटक्यात पाय
 • आपला ठेवा झाकान आणि बघा दुसऱ्याचा वाकान
 • दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती
 • आवस रडता रोवाक आणि चेडू रडता घोवाक
 • करून करून भागलो आणि देव पूजेक बसलो
 • जेच्या मनात पाप तेका पोरा होती आपोआप
 • जेच्या खिशात आणो तो म्हणता मीच शाणो
 • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाय
 • फूडचा ढोर चाल्ताला तसा पाटला
 • भेरा म्हणता तेरा आणि माजाच तूनतुना खरा
 • आपली मोरी आणि मुताक चोरी?
 • हाडाची काडा आणि बोच्याचा तूनतुना
 • गायरेतले किडे काय गायरेतच रवनत नाय
 • आवस सोसता आणि बापूस पोसता
 • आंधळा दळता आणि कुत्रा खाता
 • अंधारात केला पण उजेडात इला
 • कायच नाय कळाक – बोको गेलो म्हाळाक
 • एक कानार पगडी आणि घराक बायल उघडी

मालवणी म्हणी भाग  ५

 • येळार येळ – शीगम्याक खेळ
 • घरासारखो गुण, सासू तशी सून
 • चल चल फुडे तीन तीन वडे
 • चव नाय रव धनगरा पोटभर जेव
 • चुलीतला लाकूड चुलीतच जळाक होया
 • शेजारणीचा रस्सा आणि पोळयेचा काढून बसा
 • उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक
 • मडकेत कडी पाटी जीव ओढी
 • घरणी बरोबर वाकडा ता खायत चुलीतली लकडा
 • पडलो तरी नाक वर
 • एक मासो आणि खंडी भर रस्सो
 • खिशात नाय दमडी आणि खावची हा कोंबडी
 • धाक नाय दारारो, फुकटचो नगारो
 • तरण्याक लागली कळ आणि म्हाताऱ्याक इला बळ
 • वसावसा खान आणि मसणात जाणा
 • दुकान नाय उघडला, तो इलो उधारेक
 • नावाजललो गुरव देवळात हगलो
 • राती राजा आणि सकाळी कपाळार बोजा
 • डाळ भात लोणचा कोण नाय कोणचा
 • देव गेल्लो हगाक आणि ह्यो गेल्लो अक्कल मागाक
 • तुमचा तुमका आणि खटपट आमका?
 • गाढवा गुळ हगती तर घोरपी भीक कित्या मागती?
 • सुने आधी खावचा, लेकी आधी लेवचा
 • वरये दितय तुका गावकार म्हण माका
 • शेजारी पाजारी मड्याक आणि पावणे सोयरे वड्याक
 • बघून बघून आंगण्याची वाडी
 • अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो
 • कोणाची जळताहा दाडी आणि तेच्यार कोण पेतयता इडी
 • बारशाक वारशी नसाय आणी अवळात बसलो देसाय
 • पानवेलीच्या धर्मान शेगलाक पाणी
 • होळयेक पोळी आणि शिमाग्याक गाळी
 • खट बायलेशी पडली गाठ – म्हणता उठ मेल्या चटणी वाट
 • अमवाशेचो जल्म आणि तसलाच कर्म
 • रागान केला रायता – तेका मेळला आयता
 • इलय तरी वडे नाय इलय तरी वडे
 • रानात भय वाघाचो आणि गावात भय गावकाराचो

Malvani Language – Malvani Mhani – मालवणी म्हणी , how did you like them?

मालवणी म्हणी – सरख्ये सणसणीत (Malvani Mhani)
Tagged on: