Read Solkadhi recipe in English
मालवणी सोलकढी | Solkadi
Category मालवणी पाककला
Malvani Solkadhi Recipe - मालवणी सोलकढी ही एक विशेष चवदार आणि पाचक पाककृती आहे. याचे मुख्य घटक आहेत कोकम (आमसुले) आणि नारळाचा रस. सहसा सोलकढी जेवणानंतर नुसतीच प्यावी किंवा शेवटच्या भातावर घ्यावी अशी पध्दत आहे. कोकणातील जवळपास सर्वच घरात सोलकढी दुपारच्या जेवणात करण्यात येते.
Notes
Recipe by: Maai
....(Please do Rate/Like/Share this recipe.)
Ingredients
साहित्य:
- २ वाट्या पाणी
- ४ ते ५ कोकम
- ४ लसुन पाकळ्या
- १ इंच आले
- २ हीरव्या मिरच्या
- २ वाट्या ओल्यानारळाचा चव (खववलेले खोबरे)
- चवी पुरते मिठ
- १ चमचा बारीक चिरलेली कोथींबीर
- क्लिक करा अमेझॉन वर कोकम खरेदी साठी.....
Instructions
कृती:
- प्रथम कोकम कोमट पाण्यात भिजत घालावीत
- नंतर खववलेले नारळाचे खोबरे लसुन ओली मिरची, आले हे सर्व मिक्सरमधुन बारीक करुन घ्यावे
- त्यानंतर या वाटपामध्ये थोडे पाणी मिसळुन हे मिश्रण गाळुन घ्यावे
- या मध्ये भिजलेली कोकम पाण्यासहीत घालावे. मिठ व कींचीत साखर घालावी
- सोलकढी जेवणानंतर नुसतीच प्यावी - सोलकढी भात सुद्धा छान लागतो.
© 2021 Copyright © 2018 malvani.com
Latest posts by Maai (see all)
- Patoli recipe – rice flour – coconut sweet dish - March 29, 2018
- Malvani Black peas curry recipe (Usal) - March 28, 2018
- Nachani satu – Raagi sweet cakes recipe - March 27, 2018
मालवणी सोलकढी