बारको कधी ब्यान्केच्या गजाली क नाय पण बारक्याची बायको पयल्या पासूनच हिकमती.  सुरवातीच्या काळातच तीना अकौंट उघडलान. अकौंट तिच्या नावावर असला तरी बारक्याचा वारस म्हनून नाव होताच. आता बरेच पैसे जमा होते. बिचार्‍या बायकोन पै – पै जमऊन भरलेले. पैशे काढूक झाले हे बायकोपेक्षा बारक्याक आधीच म्हायत होते. रोज बायकोकडे टुमणा. कधी गोडीत तर कधी धमकी, मारझोड करता करता बायको काय दाढेक लागना. ती हुशारच. तीना कणकवलीच्या भाच्याक आणि मोठ्या भाओजीक सांगल्यान. रक्कम मोठी. तेव्हा ‘दोघांनीय येतव, मग कायता बघूया’,  म्हनान फोन केल्यानी.

एक दिवस मोठो भाव सकाळीच घरात इल्लो बघून बारक्याचा मस्तकच फिरला. तो समाजलो. पण भावापुढे काय चलाचा नाय आणि पैशे सोडूचेय नाय. करायचा काय? शेवटी बँकेत जावची तयारी केली असा बघून बारको बँकेत हजर. मोठ्या भावाक वचकान असल्यामुळे बारको बाहेर बसलो.

झाला कागदपत्रा पुरी झाली. बायको आणि दीर कॅशियरकडे गेल्या बरोबर बारक्यान अवसान आणून रुद्रावतार  धारण केल्यान “शुभल्या पैशे माझ्याकडे द्यायचे नायतर?”.

गजाली - बरक्याचा ब्यान्केतला धुमशानभावान मागे बघितल्यान तसो गप रवलो. भावान सांगल्यान “बँकेत तमाशा नको, भायर चल” तसो बारको खवाळलो. तुझो संबंध काय? करीत  बघूक लागलो. बँकेत सगळ्यांकाच म्हायती. लोक आपले हसतत. तसो बारको गप रवलो.

आता गजाली पैशाचे

पैशे घेवन बायको, दीर भायर  इले. फक्त बारको पुढे सरसावलो, कडाक्याचा भांडण करुन बायको बरोबर हुज्जत घालूक लागलो. तेच्या गजाली क जावची सोय नाय उरली. इतक्यात मोटारसायकल घेवन कणकवलीसून भाचो इलो. “ह्येका कसा समाजला” करीत बारक्यान आश्चर्यात बघल्यान. आता एकदम पवित्रो बदलून बारक्यान डोळ्यात पाणी भरल्यान्, भाच्याकडे दिनवाणा बघीत “बाळू तूच बघ?” करुन पायाकडे लोटांगण घातल्यान. रस्तावर ह्यो तमाशा. लोकांका सगळा म्हायतीच बारको काय माणूस तो, ताव म्हायती. तरी लोकांची सवय, कोणतरी बोललो असा कसा तेका हजार भरतरी देवचे बापडे. बारक्याक आणखीनच चेव इलो.

आता मात्र भावाचो, भाच्याचो आणि बायकोचो नाईलाज होताना दिसाक लागलो. बारको तर काय सरड्यासारखे रंग बदलूक लागलो. शेवटी भावान पाचशे रुपये काढून दिल्यान. हे घे आणि चालू पड. त्या बरोबर बारक्यान मारामारीचो पवित्रो घेतल्यान. “शुभल्या बर्‍या बोलान संसार होयो आसात तर सगळे पैसे हय दी आणि हे पाचशे तुका ठेव”. इतक्यात मघापासून गप असलेलो भाचो आता गाड्येवरसून उतारलो आणि बारक्याच्या गचाडेक धरल्यान. एक सणसणीत बसल्याबरोबर बारको फरार झालो. रात्री बारको बेपत्ता, दूसर्‍या दिवशी सुद्धा नाय. खोडी सगळ्यांकाच माहिती.

मोठो भाव मुंबयक गेलो. तसो बारको हजर.  बायको दिसल्या बरोबर “अगो xxxx देव देता आणि कर्म नेता, अशीच तुमची लायकी गो. पाचशे दिलास, पन्नास आकड्याक लावलय आणि हे बघ हजार हजार  रुपयाचे चार नोटी दाखवत बोललो. स्वप्नच तसा पडलेला, आज लखपती होणार होतय. फुटक्या नशीबाचा तू आणि ते शाणे तूका गावले. आता मासक्यो मारा. माका काय गरज नाय तुझ्या पैशाची “. बायको बापडी अवाक होऊन बघीत रवली. बारक्याचे गजाली संपान संपाचे नाय.

गजाली – बरक्याचा ब्यान्केतला धुमशान
Tagged on: