बारको गजाली मारण्यात तरबेज पण बारक्याच्या उचापतींमुळे बारक्याचेच गजाली गावात फेमस.  काय काय घटना पण बारक्याच्याच नशिबात कसे घडतत ह्या पण नवालच. हल्ली बारक्यान एक नविनच काम सुरु केल्यान. कोणाक कल्पनापण येवची नाय असो बिन भांडवली धंदो. डायरेक्ट तहसिलदार ऑफिसात रजिस्टार ऑफिसमध्ये खरेदी खता/गहाण खता होतत थय हल्ली बारको दिसता. पहिल्यापासूनच बारको हुशारच एक-दोन स्टॅम्प व्हेंडरांच्या ओळखीवर पुढे पुढे करुन सायबांची ओळख काढल्यान आणि आता सायबाक पान, सिगारेट, गुटखा गुपचुप आणून देणारो खास माणूस झालो.

आता किती दिवस काम करित ह्या सांगाक येवचा नाय; पण सायबाबरोबर ओळखीमुळे गावात आणि पंचक्रोशीत जमिनीची कामा करुन ये‍णार्‍यांकडे बारक्याची वट वाढली. तेच्यात विशेष महत्त्वाचा म्हणजे सायबान तेका ओळखीची सही करुक सांगूक लागलो. बारक्याच्या दृष्टीन ता मोठा क्रेडीटच होता आणि बरा फुकट नाय. स्टॅम्प व्हेंडर संध्याकाळी पन्नास रुपये देयतय. सायब फुकट पान देय, चहा मिळा आणि पाटर्यो. सय बद्दल, वेगळे पैसे धा वीस रुपये देयत. ऑफिसात ”बारको खय”, ”बारक्या वायच सय करुक ये” हे धावपळीतल्या स्टॅम्प व्हेंडरचे रोजचे शब्द होते.

गजाली - बारक्याचो अ‍ॅक्सिडन्टत्या दिवशी बारक्याक झालो उशिर. खय पावण्यांकडे गेलो. सकाळी येताना वरवड्यात गाडी पंक्चर झाली. मंगळवारचो बाजार. लोक गाळी घालीत उतारले. बारको पण उतारलो. कणकवली काय खुप लांब नाय होती. पण बारको चलत फिरणारो न्हयच. हेका हात दाखवित तेका हात दाखवित करता करता एका स्कूटरवरच्या पोरग्यान हेका लिफ्ट दिल्यान. तोपर्यंत अकरा वाजान गेले. बारक्यान स्कूटरीर बसल्याबरोबर पान खाल्यान. ऊन जोरात होता आणि चेतना पान बारक्याक लागला. तेनी गजाली सुरूच केली असते पण तसोच स्कुटरवर बसान रवलो. उतारतलो तरी कसो. कलमठात वर  स्कुटर इली. पोरगो स्पीडमध्ये होतो. एकदम टर्न मारल्यान आणि एका सायडीन स्टायलीत बसलल्या बारक्याचे पुढचे पाय मोडक्या बोअरवेलच्या खांबाक आपाटले. आणि काय समजाच्या आधीच धाडकन आवाज झालो आणि बारको उपडी पडलो. कसोतरी स्कुटरवालो सावारलो. ”पडलो पडलो” करीत बाजूच्या माशेवाल्या गाबत्यानी आरड केल्यानी, दुकानातली माणसा धावली आजूबाजूची म्हणता म्हणता बरीच गर्दी जमा झाली. आधीच बारको किरकोळ. तेच्यात भर दुपारी तंबाखु लागललो आणि गाड्येवरुन पडल्या बरोबर बारक्याची शुध्द गेली.

बारक्याचो अ‍ॅक्सिडन्ट – स्कुटरवालो हबाकलो

दोघा तिघानी उचलल्यानी. बघतत तर काय बारक्यान शर्ट घट्ट धरललो आणि शर्ट रक्तान लाल झाललो. आता मात्र स्कुटरवालो हबाकलो. इतक्या लागान येयत ह्येची तेका कल्पनाच नाय. रक्त बघीतल्या बरोबर लोक सावध झाले. प्रतिष्ठीत दोघा तिघानी स्कुटरवाल्याक तापवल्यानी. माशेवाल्या गाबत्या बडबडाक लागल्यो. स्कुटरवालो ”झक मारलय नी लिफ्ट दिलय” मनात म्हणाक लागलो. ”अरे बघतस काय, तेका बिरमोळ्याकडे घेवन जा” कोणीतरी फर्मावल्यान पण बारको काय स्कुटरवर  बसण्याच्या स्थितीत नाय होतो. तेवढ्यात एक रिक्षा येताना दिसली. लोकांनी रिक्षा थांबवली. रिक्षावाल्याक बिरमोळेच्या हॉस्पिटलात सोडूक सांगुक लागले. रिक्षावाल्यान रक्त बघून नायच म्हणाक लागलो. तसो लोकानी जोर केल्यानी. स्कुटरवालो पुढे आसा तो बघतलो काय ता. तेच्या गाड्ये वरसून पडलो तो. तु फक्त हेका सोडून ये. पैशे स्कुटरवालो देतोलो. तसो नाय नाय करीत रिक्षावालो तयार झालो आणि स्कुटरवाल्याचा ताँड बघण्यासारख्या झाला. दोघानी बारक्याक रिक्षेत घातल्यानी आणि वरात पुढे गेली. स्कुटरवालो पुढे आणि   रिक्षा मागे.

पाच मिनिटावर हॉस्पिटल पण पाच मिनिटातच रिक्षावालो परत इलो आणि दुकाना समोर रिक्षा लावन आरडाक लागलो. ”ह्येका पैलो उतरा” काय झाला परत गर्दी जमा झाली. रिक्षावाल्यान सांगितल्यान तो स्कुटरवालो मासळी बाजारात गर्दीतसून पळलो. मी साईड काढीपर्यंत खय गायब झालो. लोक आश्चर्यचकितच झाले. तसो रिक्षावालो उतारलो आणि बारक्याच्या दोनय खांद्याका धरुन ओढल्यान आणि रिक्षाच्या खाली उतरल्यान. आता बारको थोडो सावध झालो. उतरल्या बरोबर पटकन थुकलो. पानाची लाल थुकी आणि शर्टावर पडलेला रक्त बघून रिक्षावालो आराडलो ”मेल्यानू ह्या काय रक्त न्हय मेल्याची पानाची थुकी ती” ”काय झाला नाय तेका” खरोखरच ती पानाची लाल भडक थुकी शर्टावर पडलेली बघून बारको लाजलो. शरमेन खाली बघूक लागलो. माशेवाल्या बायकानी आता मात्र बारक्याची पुजा सुरु केल्यानी, ”मेले खातत आणि लोकांका बोवाळ करतत.” ‘दारुडे मेले’ ”पाना कसली खातत”. बारको आपलो सगळ्यांचो अर्थ लावीत काय झाला म्हणान बघीत रवलो. हळूहळू तेच्या लक्षात ईला. तसा हळूच काढतो पाय घेवन सटाकलो पण बारक्याचे गजाली सांगून संपाचे नाय.

गजाली – बारक्याचो अ‍ॅक्सिडन्ट
Tagged on: