मरणाचा उकडाक जाता म्हणान (मालवणी विनोद | Malvani jokes)

Malvani Jokes
Malvani Jokes

अर्ध्याच तासाचीचं वाट होती पण रातचे साडेबारा वाजान गेल्ले आणि व्हाळा कडच्या पिपळा खाली किरीस्तावांची मसानवट. भीती वाटाक नको म्हणान मन्यान भायर पडतानाच पावशेर चढवन तयारी केल्ली. चलता चलता शेवटाक पिपळा कडे पोचलो. बगता तर काय, येक माणूस उघड्या आंगान येका कबरीर बसललो. मान्याक चडेतच मुताक झाल्या सारख्या वाटला पण पावशेराचो जोर आजून शिल्लक होतो.

मनो: काय ओ, इतक्या रातचे मसणात बसलात ते कसलो भयं नाय वाटत?

भूत: मसणात कसलो भयं? भूतूर कबरीत नुसता मरणाचा उकडाक जाता म्हणान वायचं भायर येवन बसलय आपलो!!!.

++++++++++

डॉक्टर खाली राहिले (मालवणी विनोद | Malvani jokes)

डोळे उघडल्यान तेवा बारक्याक आठवला आपलो ऍक्सीटन झाल्लो आणि उचलून हास्पिटलात न्हेय होते. सगळीकडे नजर फिरयल्यान तर फक्त पार्सेकर दशावतारी मंडळ नटान तयार दिसला.

बारको: ओ माका खय घेवन इलास? आणि डाक्टर खय गेले?

चित्रगुप्त: बाळ, डॉक्टर खाली राहिले, त्यांची पाळी यायला अजून अवकाश आहे.

++++++++++

श्री रवळनाथाची मनी ऑर्डर (मालवणी विनोद | Malvani jokes)

वाडीच्या पोष्टात एक पत्र येता, सॉरटिंग करताना पोस्टमन पत्तो बघता तर “श्री देव रवळनाथ, मु.पो. स्वर्ग” सगळे हसतत, गंमत म्हणान पोस्टमन पुढचा वाचता “देवा रवळनाथा, बाबीच्या आयेचो नमस्कार. बाबी बायलेक घेवन मुंबैक गेलो तेवा पासून एक पैसो पाठवल्यान नाय तीन म्हयन्यात, माझी अगदीच इटमणा झाली रे देवा, माझ्या पोटा पाणयाचा काय करू? गेले दोन दिवस नुसती पेज आणि तोराची चटणी खावन काढलंय. काल मिरगाच्या दिवसाक सगळी कोंबडी सुदा चोरयेक गेली. काळू गाय लोकाचो तरवो खावन आपलो दिवस काढता. पण असा आणि किती दिवस चलताला? तेवा कायतरी सोय कर लवकर. वाट बगतंय.”

सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येता. पोष्टाचे लोक कदी नाय ती सोमती वरगणी काढतत. ९० रुपये जमा जातत. पोस्टमन बाबीच्या आयेक नेवन दिता. रवळनाथ पावलो आणि सोमती मनीऑर्डर केल्यान  बाबीच्या आयेक वायचं बारा दिसता.

दोन दिवसांनी परत बाबीच्या आयेचा एक पत्र पोष्टात येता. पोस्टमन वाचूक सुरवात करता “देवा रवळनाथा, पावलस रे बाबा अडीअडचणीक, पैशे पोचले. पण माझी एक तक्रार आसा. माका म्हायती आसा तू १०० रुपये पाठवल आसतंलस ते. पण पोष्टातल्या लोकांनी माका ९० रुपयेच दिले आणि १० आपण खाल्यानी. चोर मेले. वाटोळा कर मेल्यांचा.”

++++++++++

शाळेक उशीर (मालवणी विनोद | Malvani jokes)

गणाक आज सुद्धा शाळेक उशीर जाता, मास्तर खुपच रागात आसत.

मास्तर: गणा, आजही एवढ्या उशिरा आलास तो?

गणा: गुरुजीनू तुमी आपले तुमच्या टायमार शाळा सुरू करा, माज्यासाठी मुद्दाम थांबान रवा नको.

++++++++++

परत एकदा शाळेक उशीर (मालवणी विनोद | Malvani jokes)

गणाक परत एकदा शाळेक उशीर जाता, मास्तर खुपच रागात आसत.

मास्तर: गणा, आजही एवढ्या उशिरा आलास तो?

गणा: गुरुजीनू, आपा भटजीचो रुपयो सांडललो देवळा कडे, ते कितीतरी वेळ शोधीत होते.

मास्तर: तुझं काय काम होत तिथे? तुला का उशीर झाला?

गणा: मी तेच्यार पाय ठेवन उभो होतंय ना!!!

तेच विनोद मालवणीत – भाग २ (Malvani Jokes)
Tagged on: