लीवन ठेवला म्हणान (मालवणी विनोद | Malvani jokes)
रोज दवाखान्याच्या भायर उभो दिसणाऱ्या बारक्याक देशपांडे डॉक्टरीण बाई एक दिवस आत बोलवता.
देशपांडे: काय रे, रोज तिथे उभा राहून दवाखान्यातल्या बायकांना बघत राहतोस, लाज नाही वाटत? बेशरम.
बारको: बाईनू तुम्हीच भायर बोर्ड लीवन ठेवलास “स्त्रियांना पहाण्याची वेळ स.९ ते ११.”
++++++++++
सुसल्याचो पाठलाग (मालवणी विनोद | Malvani jokes)

आंधार पडत इललो, सुसला आजून कॉलेजातसून येवक नाय म्हणान बाबा खुपच चिडलले होते.थोड्या वेळान सुसला इला.
बाबा: काय गो सुसल्या, इतको उशीर कित्याक झालो?
सुसला: बाबानू, कॉलेज पासून घरा पर्यात एक पोरगो माझो सारखो पाठलाग करी होतो.
बाबा: पण तुका कसो उशीर झालो?
सुसला: काय सांगू बाबानू, तो खुपच हळूहळू चला होतो.
++++++++++
साधा ऑपरेशन (मालवणी विनोद | Malvani jokes)
कायसा जावन बारको शिक पडता. ओरोशीच्या हास्पिटलात ऍडमीट करतत. संध्याकाळी पमो भेटाक जाता तर बारको घाबरो गुबरो जावन खाटिच्या एका कोपऱ्यात बसलालो.
पमो: बारक्या, काय झाला रे?
बारको: भीती वाटता रे!! मघाशी नर्स सांगी होती “अगदी साधं ऑपरेशन आहे, एवढं घाबरण्याच काहीच कारण नाही.”
पमो: मगे तुका कसली इतकी भीती वाटता? नरशीन संगल्यान ना घाबराचा कारण नाय म्हणान.
बारको: आरे मका नाय रे बाबा, ती डाक्टारक सांगी होती.
++++++++++
बायकोची साफ सफाय (मालवणी विनोद | Malvani jokes)
मोठ्या घरात खूप वर्षा एकटोच रवणाऱ्या पारकारांच्या संजूचा लगीन जाता. बायको बापडी दुसऱ्या दिवसा उठान सगळा घर साफ करता. संजू अकरा वाजताना उठता कोणाकतरी फोन करुक टेबलाकडे जाता आणि आरड मारीत भायर धावता. “अगो फोनाच्या टेबलावरची सगळी धूळ कोणी काढून टाकली? मी तेच्यार महत्वाचे फोन नबंर लीवन ठेवलंलय ना!”
++++++++++
हायटेक भिकारी – सुपर हायटेक मावशी (मालवणी विनोद | Malvani jokes)
आका मावशेच्या दारात भिकारी येता.
भिकारी: मावशे, भाकरी वाढ गे बाय!!
मावशी: अरे, भाकरी अजून जावक नाय रे बाबा, मगे थोड्या वेळान ये.
भिकारी: माजो मोबाईल नंबर लीवन घे आणि भाकरी झाली काय मिस्ड कॉल दी.
मावशी: तसा कित्या? भाकरी झाली काय माझा फेसबुक अपडेट करतंय, ता बघ आणि ये.
++++++++++
लाखोपती भिकारी (मालवणी विनोद | Malvani jokes)
भिकारी बबन्याच्या दुकानात जाता.
भिकारी: सायब एक रुपयो तरी द्या ओ.
बबनो: उद्या ये रे, आता ह्या टायमाक काय नाय मेळाचा.
भिकारी (मनातच) रोज उद्या ये, उद्या ये च्या भानगडीत ह्या एका गावात गेल्या पाच वर्षात एक रुपयाच्या हिशोबान माझे लाखो रुपये अडकान पडलेत.
- भूतावळ – top 10 close encounters - August 29, 2018
- मसाल्याचे पदार्थ ओळखा..(भाग 2) - November 11, 2017
- मसाल्याचे पदार्थ ओळखा..(भाग १) - November 11, 2017