बातमी (मालवणी विनोद | Malvani jokes)

दिपलो एकदा बारात बसान ब-यापैकी दमट जाता. तितक्यात थय बारको येता.
बारको: काय रे, खुपच दुखात दिसतस, काय झाला तरी काय?
दिपलो: काय सांगतलय बाबा? ऑगस्टात आये गेली, ५२००० माझ्या नावार ठेवन गेली रे! मगे सप्टेंबरात बाबा गेले.. ता घर आणि ९०००० माका मागे ठेवन गेले रे! ऑक्टोबरात कुडाळची आते वारली – तीना माझ्या नावार १० गुंठे जमीन आणि ३५००० ठेवन गेली रे!
बारको: अरेरे… तीन म्हयन्यात जवळची तीन माणसा गेली…. खुपच वायट झाला.
दिपलो: काय सांगतलय बाबा? आता हो नोहेंबर उद्या संपाक इलो तरी आजून आणखी कोणाचीच बातमी नाय ईली रे!

+++++++++++++++++++++++++++

रिअँक्षन (मालवणी विनोद | Malvani jokes)

विनोद मालवणीत Malvani Jokes
Malvani Jokes

बाबा: काय रे, इतक्या लवकर कसो इलस?
गणा: मी बाळ्याक मारलंय म्हणान गुरुजीनीच घराक पाठयला.
बाबा: अरे पण तू बाळ्याक मारलंय कित्याक?
गणा: माका आज लवकर येवचा होता.
++++++++++

 

कठीण पेपर (मालवणी विनोद | Malvani jokes)

बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना? शाळेत जावक नाय तो?
गंपू : पेपर खुपच कठीण होतो बाबानू.
बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला?
गंपू : पेपर कालच फुटलोलो बाबानू, मी वाचून तेवाच मी समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय.
++++++++++

तेच विनोद मालवणीत – भाग 5 (Malvani Jokes)
Tagged on: