उखाण्यातून पतीचे नाव घ्यायचे ती कला सर्वांनाच जमते असे नाही. दोन तीन ओळींपासून ते लांबलचक असा उखाणा घेतला जातो. या उखाण्यांमधून चालीरिती, माहेरची, सासरची नाती, सण नवर्याचे वर्णन याबरोबर त्यात इतिहास, भूगोलाचाही यमक जुळवत समावेश केला जातो.
मराठी उखाणे
१. आईने दिले वळण वडिलांनी दिले शिक्षण,
…….. रावांचे नाव घेते हेच मा़झे भुषण.
२. आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून,
…….. रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.
३. आई – वडिलांचे प्रेम हा माहेरचा आहेर,
…….. रावांसाठी जोडले सासर नी माहेर.
४. चांदीच्या आसनावर सोन्याचा गणपती,
चांदीच्या मखराजवळ चांदीचा हत्ती,
सजावटीने सगळ्या सजल्या भिंती,
अभिमानाने सांगते …….. राव माझे पती.
५. चांदीची जोडवी लग्नाची खूण,
…….. रावांचे नाव घेते …….. ची सून.
६. नागपंचमी दिवशी केला साखरभात,
…….. रावांचे नाव घेते …….. ची नात.
७. लग्नाच्या पंगतीत उखाणा घेते खास,
…….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
८. वणीच्या देवीला घातला कोल्हापुरी साज,
…….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
९. वरुणराजा वरुणराजा पाऊस येवू दे जोरात,
…….. रावांचे नाव घेते …….. यांच्या घरात.
१०. शुभमंगल शुभप्रसंगी दाराला बांधतात तोरण,
…….. रावांचे नाव घ्यायला मला नाही लागत कारण.
११. सूर्य, चंद्र, तारे आहेत आकाशाचे सोबती,
…….. राव माझे साताजन्माचे साथी.
१२. समुद्राच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी,
…….. रावांचे नाव घेते सुखी नांदते सासरी.
१३. अजिंठा, वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
…….. रावांच्या साथीने संसार होईल मधुर.
१४. मनाच्या गाभार्यात गणपतीची मूर्ती,
…….. रावांशी विवाह होण्याची झाली इछापूर्ती.
१५. नमस्कार करते हजारांना आशीर्वाद घेते लाखाचा,
…….. रावांचा संसार करेन मी सुखाचा.
१६. वेणी घालते शेवंतीची गजरा माळते मोगर्याचा,
…….. रावांसोबत संसार करीन सुखाचा.
१७. फुलांच्या मखमलीवर शुभमंगल झाले,
…….. ची सावली होऊन सप्तपदी चालले.
१८. श्रावणात निसर्ग होतो हिरवागार,
…….. रावांच्या नावाने घातला मंगळसुत्राचा हार.
१९. नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
…….. रावांचा स्वभाव आहे फारच उदार.
२०. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून,
…….. रावांचे नाव घेते …….. यांची सून.
संकलन: पल्लवी साळवी
- फुगड्या – उखाणे – फेर – कोंबडा - August 9, 2016
- मराठी उखाणे - August 6, 2016