पातोळ्या - पाककृती
वर्षानुवर्षे कोकणात गणेश चतुर्थीला खास गणपतीच्या नैवेद्यासाठी पातोळ्या करण्याची पध्दत आहे. हळदीच्या पानावर तांदळाचे पीठ थापून आणि त्यात गुळ खोबऱ्याचे सारण घालून वाफवलेल्या पातोळ्यांची लज्जत हा तर खास कोकणी ठेवा आहे.
Notes
Recipe by: Maai
....(Please do Rate/Like/Share this recipe.)
Ingredients
साहित्य
- १ वाटी तांदळाचे पीठ
- १ वाटी पाणी
- १ चमचा तूप
- १ वाटी किसलेले खोबरे
- अर्धा वाटी किसलेले गुळ
- अर्धा चमचा वेलची पूड
- ८ ते १० हळदीची पाने
- क्लिक करा अमेझॉन वर तांदळाचे पीठ खरेदी साठी.....
Instructions
पातोळ्या कृती
- प्रथम ओले खोबरे, गुळ, वेलची एकत्र शिजावून सारण करून घ्या.
- एक वाटी पाणी उकळून त्यात तूप आणि मीठ टाका व नंतर तांदळाचे पीठ टाकून एक उकड काढून घ्या.(फार शीजऊ नका)
- थोडेसे थंड झाल्यावर पीठ व्यवस्थित माळून घ्या.
- पिठाचीे पेढ्या एवढी गोळी घ्या आणि हळदीच्या पानाला पाण्याचा हलकासा हात लाऊन त्यात दोन्ही बाजूला पसरा.
- पानाच्या एका बाजूला सारण पसरा आणि पान दुमडून ठेवा.
- सर्व पाने तयार झाल्यावर मोदक पात्रात उकडून घ्या.
- पातोळ्या तयार!
© 2021 Copyright © 2018 malvani.com
Latest posts by Maai (see all)
- Patoli recipe – rice flour – coconut sweet dish - March 29, 2018
- Malvani Black peas curry recipe (Usal) - March 28, 2018
- Nachani satu – Raagi sweet cakes recipe - March 27, 2018
पातोळ्या रेसिपी