आपा आणि यस्टी महामंडळ

आपा आणि यस्टी महामंडळ…

वस्तीची गाडी आज टायमावर इल्ली
आपांची छत्री सरसावली
शाळेच्या स्टोपाक मास्तरानीच
बेल वाजय्ल्यांनी

यस्टीकडे बघान आपा मातर पुटपुटले
दर्वाजाचो आवाजानाच गाडी चल्ली
आपा मास्तरांच्या बाजूकच बसले
पिशेतली चिल्लर सरसावत हाल्फबाजार म्हणाले.
तेंचा त्वांड आणि एफम मणजे याकच
यस्टी खाली झाल्याशिवाय काय बंद नाय

आपा मंजे आपलो येक रसाळ फणस
वरसून राग मातर आत्सून प्रेमळ
यस्टीची दशा बघून नजर मास्तरांकडे गेली
काय ओ मास्तराणु !! अजून नळे काय परताक नाय?
पावसा पाण्याचे दिस, अजून काय !
मास्तरांची तीकटा काय भिजणत नाय?

त्यावर आम्ह्ची पोरा काय गप बसतली?
आपांचो शब्द खाली पाडूची बिशादच काय!
व्हय व्हय ! आम्ही काय इर्ला घेवाण येवची काय?
तीकटाचे पैसे औशिन मोजून दिल्यान नाय!

मास्तर त्वांडात मारतत तसे गप !!
आपांका उत्तर म्हणान डेपो मास्तरांचा नाव
बोल्लय आता पण पाठवतीत तेव्हा
शेवटी काय सरकारी कारभार येळेक ठप्प .

असो ह्यो यस्टी महामंडळाचो लाल डब्बो…….

राम ….

आपा आणि यस्टी महामंडळ
Tagged on: