मालवणी जेवणात कोळंबी कालवण – kolambi kalvan – या पदार्थाचे बरेच प्रकार चाखायला मिळू मिळतात. त्यापैकीच कोळंबीची मालवणी गरम मसाल्याची कढी (आमटी) हा एक लोकप्रिय प्रकार आहे. कोळंबी घेताना पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची असावी. पण लाल कोळंबी बहुतांशी वातूळ असते. कोळंबीच्या या प्रकारच्या आमटीत अगदी थोड्या प्रमाणात वापरलेले बटाटे व शेवग्याच्या शेंगा एक वेगळीच लज्जत आणतात.
कोळंबी कालवण – मालवणी स्टायल
